अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३६,६७५ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २७ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५३ […]
निष्ठावंत शिवसैनिक मा. मंत्री अनिलभैय्या राठोड यांना श्रद्धांजली.
५ ऑगस्ट २०२० रोजी माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांचे निधन झाले. आज राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. नगरच्या नक्षत्र लॉनमध्ये झालेल्या या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनीच अनिलभैय्या राठोड यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांच्या बरोबरच्या विविध आठवणीला उजाळा दिला. या श्रद्धांजली […]
जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे- मा.हरिष जायभाये
यावर्षी झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाचे पाणी असंपादित क्षेत्रात घुसून पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी, जनआधार सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष हरीष जायभाये यांनी निवेदना द्वारे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा.जयंत पाटील साहेब यांच्याकडे केली. हरिष जायभाये यांच्या समवेत धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मा.जयंत पाटील साहेब यांची मंत्रालयीन दालनात भेट घेऊन […]
ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली येथे कोविड-१९ योद्धयांंचा गौरव.
आज ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली (ता. नेवासा) येथे ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, यांना स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी मा.पंचायत समिती सदस्य श्री.नानाभाऊ नवथर, श्री.संतोष काळे पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील, सरपंच श्रीमती रेखाताई दत्तात्रय कदम, उपसरपंच श्री.अमोल अशोक […]
राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण.
१४ व २७ ऑगस्टला ट्वीट करत कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी कोरोना लस वितरणाबाबत काही सूचना केंद्र सरकारला केल्या होत्या.केंद्र सरकारने सदर सूचना किती गांभीर्याने घेतल्या हा वेगळा मुद्दा आहे. A fair and inclusive Covid vaccine access strategy should have been in place by now. But there are still no signs of it. […]
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. यात महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. मा.विनोद तावडे, मा.पंकजा मुंडे, मा.सुनील देवधर, मा.विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, मा.हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदाची जबादारी आता कर्नाटकचे युवा खा.तेजस्वी सूर्या यांच्या कडे देण्यात आली […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ७५६ कोरोना बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा ?
(अहमदनगर -अनिरुध्द तिडके) अहमदनगर महापालिकेत शिवसेनेने दिलेला शब्द पाळल्याने भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या श्री. मनोज कोतकर यांची स्थायी सभापतिपदी निवड झाली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार मा. संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून आभार मानले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीशी असलेले मतभेद मिटविण्याचे काम आता शिवसेनेत नव्याने दाखल झालेले जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख करीत […]
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, छत्रपती युवा सेनेचे तहसीलदार नेवासा यांना निवेदन.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून कपाशी, बाजरी ,सोयाबीन ,तूर ,मुग ,या सह अन्य पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे आधीच शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली असून त्याकडे प्रशासनाने मात्र पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या हातात एकाही रुपयाचे पीक पदरी पडणार नाही, अशी अवस्था सद्यस्थितीत आहे. सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी झालेला असून बहुतांश शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज व […]
अहमदनगर मनपा स्वीकृत सदस्य निवड, ऑनलाईन पध्दतीने होणार सभा.
अहमदनगर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्य निवड होणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस न झाल्याने सदस्य निवड रखडली होती. आता पुन्हा सभा सभा होणार असुन. आयुक्तांकडे नावे व कागदपत्रे सादर […]