यावर्षी झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाचे पाणी असंपादित क्षेत्रात घुसून पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी, जनआधार सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष हरीष जायभाये यांनी निवेदना द्वारे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा.जयंत पाटील साहेब यांच्याकडे केली. हरिष जायभाये यांच्या समवेत धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मा.जयंत पाटील साहेब यांची मंत्रालयीन दालनात भेट घेऊन निवेदन दिले.
          मागील वर्षी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरने असंपादित जमिनीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांचे पंचनामे होऊन पीक परीगणना तक्ता, प्राधिकरण कार्यालया कडे सादर करण्यात आला होता. एक वर्ष उलटले तरी संबंधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसुन, या प्रकरणी तातडीने कार्यवाही करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
          यंदहि तीच परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांनच्या तूर, भुईमूग, ऊस, कपाशी, फळबाग इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ होणे गरजेचे असून, त्याची नुकसान भरपाई तातडीने मिळावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी जनआधार सामाजिक संघटन तालुका अध्यक्ष हरिष जायभाये, सहसचिव अमोल भोसले, रवींद्र कराड आदी उपस्थित होते.

आणखी बातम्या

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण.

राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण.

अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा ?

ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली येथे कोविड-१९ योद्धयांचा गौरव.