१४ व २७ ऑगस्टला ट्वीट करत कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी कोरोना लस वितरणाबाबत काही सूचना केंद्र सरकारला केल्या होत्या.केंद्र सरकारने सदर सूचना किती गांभीर्याने घेतल्या हा वेगळा मुद्दा आहे.

A fair and inclusive Covid vaccine access strategy should have been in place by now.

But there are still no signs of it.

GOI’s unpreparedness is alarming. https://t.co/AUjumgGjGC

— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 27, 2020

           परंतु राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला मुदयाची आज पुन्हा सिरम इंस्टीट्यूटचे (सिरम इंस्टीट्यूट जिथे कोरोनावर लस बनविण्याचे काम चालू आहे) संचालक अदर पूनावाला यांनी ट्वीट करत आठवण करून दिली आहे. त्यांनी यात म्हंटले आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला कोरोनाची लस विकत घेणे व तसेच ती भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे याची तयारी करणे गरजेचे आहे. आणि येत्या काळासाठी हेच आपल्यासमोरील खरे आव्हान असेल.

Quick question; will the government of India have 80,000 crores available, over the next one year? Because that's what @MoHFW_INDIA needs, to buy and distribute the vaccine to everyone in India. This is the next concerning challenge we need to tackle. @PMOIndia

— Adar Poonawalla (@adarpoonawalla) September 26, 2020

           पूनावाला यांनी उपस्थित केलेला मुद्दा राहुल गांधींनी दीड महिन्यापूर्वीच उपस्थित केला होता. केंद्र सरकारकडे लस वितरण करण्याची एक रणनीती असायला हवी. कोरोनासाठीची लस बनवणाऱ्या देशांपैकी भारत हा एक देश असेल, असाही विश्वास त्यावेळी राहुल गांधींनी यांनी व्यक्त केला होता.
           विरोधी पक्षाचा नेता म्हणून केंद्र सरकार राहुल गांधींची दखल घेत नसले तरी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेणे गरजेचे आहे. राहुल गांधी आणि अदर पूनावाला यांनी उपस्थित केलेला मुद्दा केंद्र सरकार आता किती गांभीर्याने घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे आणि आरोग्य यंत्रणांचे लक्ष लागलेले आहे.

आणखी बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली येथे कोविड-१९ योद्धयांचा गौरव.

अहमदनगर मनापा स्वीकृत सदस्य निवड, ऑनलाईन पध्दतीने होणार सभा.

अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा ?

जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे- मा.हरिष जायभाये