अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७५६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४५७० इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३६ आणि अँटीजेन चाचणीत ३६० रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, अकोले १७, जामखेड ०८, कर्जत ०१,कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १३, नेवासा ०६, पारनेर ०१, पाथर्डी ०७, शेवगाव ०५, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २३६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८७,अकोले ०४, जामखेड ०३, कर्जत ०८, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण २४, नेवासा १५, पारनेर ०७, पाथर्डी ०९, राहाता १८, राहुरी १९, संगमनेर ०२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ३२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४१९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २६, अकोले १८, जामखेड २१, कर्जत १४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण १८, नेवासा १६, पारनेर १७, पाथर्डी ३८, राहाता ३२, राहुरी ०९, संगमनेर ५६, शेवगाव ३६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज ५१३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ८०, संगमनेर २७, राहाता ५८, पाथर्डी ३६, नगर ग्रा. ४२, श्रीरामपूर १५, नेवासा १९, श्रीगोंदा ०७, पारनेर २३, अकोले ४६, राहुरी ३३, शेवगाव १५, कोपरगाव ४७, जामखेड ४०, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: ३६१५७
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ४५७०
   मृत्यू: ६७९
   एकूण रूग्ण संख्या: ४१४०६

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आणखी बातम्या

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण.

अहमदनगर मनापा स्वीकृत सदस्य निवड, ऑनलाईन पध्दतीने होणार सभा.

अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा ?

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, छत्रपती युवा सेनेचे तहसीलदार नेवासा यांना निवेदन.