भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. यात महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. मा.विनोद तावडे, मा.पंकजा मुंडे, मा.सुनील देवधर, मा.विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, मा.हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदाची जबादारी आता कर्नाटकचे युवा खा.तेजस्वी सूर्या यांच्या कडे देण्यात आली आहे याआधी हि जबाबदारी मा.पूनम महाजन यांच्याकडे होती.
           मा. विनोद तावडे यांनी या नव्या जबाबदारीचे स्वागत केलं आहे. व नेते मा.नरेंद्र मोदी, मा.अमित शहा, मा.जे.पी.नड्डा, मा.देवेंद्र फडणवीस, मा.चंद्रकांतदादा पाटील यांचा मनापासून आभार मानले.
           याचप्रमाणे पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून नव्या जबाबदारी बद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी, गृहमंत्री मा.अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय नेत्यांचे आभार मानले आहेत. तसंच, आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा यांचेही आभार मानले आहेत.
           तसेच मा.सुनील देवधर, मा.विजया रहाटकर यांनीही या नवीन जबाबदारीचे स्वागत करून ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय नेत्यांचे आभार मानले आहेत.

आणखी बातम्या

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण.

अहमदनगर मनापा स्वीकृत सदस्य निवड, ऑनलाईन पध्दतीने होणार सभा.

अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा ?

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, छत्रपती युवा सेनेचे तहसीलदार नेवासा यांना निवेदन.