५ ऑगस्ट २०२० रोजी माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांचे निधन झाले. आज राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. नगरच्या नक्षत्र लॉनमध्ये झालेल्या या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनीच अनिलभैय्या राठोड यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांच्या बरोबरच्या विविध आठवणीला उजाळा दिला. या श्रद्धांजली सभेमध्ये अनिल राठोड यांना राज्यातील मान्यवरांनी उपस्थित राहून तसेच काहींनी फोनद्वारे, व्हिडिओद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.
           यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, विधानसभेचे माजी उपसभापती विजयराव औटी, रा.स्व.संघाचे प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, दिप चव्हाण, अभिषेक कळमकर, सुरेखा कदम, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, बाबुशेठ टायरवाले, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, अनिल शिंदे, गणेश कवडे, श्याम नळकांडे, योगीराज गाडे, अनिल बोरुडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, आदींसह विविध पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
          माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गो-हे, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार प्रताप जाधव, खासदार गिरीश बापट, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी फोनद्वारे तसेच व्हिडिओद्वारे माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३६,६७५ रुग्ण बरे होऊन परतले घरी.

राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण.

जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे- मा.हरिष जायभाये

ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली येथे कोविड-१९ योद्धयांचा गौरव.