कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन.
कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भालगावच्या सरपंच डॉक्टर मनोरमा खेडकर तसेच परिसरातील शेतकरी, व्यावसायिक यांनी खासदार मा.सुजयजी विखे व आमदार मा.मोनिका ताई राजळे यांना एका निवेदना द्वारे दिला. यासाठी त्यांनी खालीलप्रमाणे निवेदन दिले आहे. पाथर्डी तालुक्यातुन जात असलेला कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्हयातून पाथर्डी खरवंडी मार्गे […]
स्नेहालय उचल फाउंडेशन च्या वतीने गरजू महिलांना आटा चक्कीचे वाटप.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि त्या त्यामुळे होणारे लॉकडाऊन यामुळे बेरोजगारीची त्सुनामी भारतासह संपूर्ण जगावर कोसळली. यात सर्वात जास्त भरडला गेला तो म्हणजे हातावर पोट असणारा व मोलमजुरी करून जगणारा मजूरवर्ग. पण याही परिस्थितीत विविध उपक्रमाद्वार “स्नेहालय-उचल फाउंडेशन” ने आपले कार्य सातत्याने सुरू ठेवून अनेक कुटुंबांना किराणा अन्नधान्य इत्यादी पुरवण्याचे काम केले. गेल्या आठवड्यात स्नेहालयाचे […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना डिस्चार्ज तर ४०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०५ […]
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान घेतला विविध कामाचा आढावा.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी नुकताच कर्जत तालुक्याच्या दौरा केला या दरम्यान त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान तोरकडवाडी (ता. कर्जत) येथे जि. प. अहमदनगर यांच्या वतिने बांधलेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. याच दौऱ्यादरम्यान कर्जत येथील उप जिल्हा रुग्णालयाला भेट दिली, तसेच येथील कोविड सेंटर ची […]
जयश्री सुरेश घुले (आव्हाड) यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड
पाथर्डी येथील रहिवासी व सध्या सातारा तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या जयश्री घुले (आव्हाड) यांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली. जयश्री घुले यांनी २००६ साली राहुरी विद्यापीठातुन एम.एस्सी अॅग्री पर्यंत शिक्षण घेतले असुन, सामान्य परिस्थिती मधून आपले शिक्षण पूर्ण करून कुठला ही क्लास न करता चिकाटी, आत्मविश्वास व कुटुंबाची साथ आशा परिस्थितीत जिद्दीने प्रयत्न केले व […]
पिंपरी महापालिकेच्या विरोधात रयत परिषदेची ‘निदर्शने’
कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पातून केवळ ३३ टक्के खर्च करण्याची मर्यादा सरकारने घालून दिली आहे.मात्र, महापालिकेने विविध विभागांतर्गत अनावश्यक कामेही काढली आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून मान्यता घेतली आहे. यासाठी आधीही रयत परिषदेने या बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यानां पत्र लिहिलेले आहे. रयत विद्यार्थी परिषदेने बुधवारी निदर्शने केली. महापालिके तर्फे सुरु असलेल्या अनावश्यक कामांचे प्रस्ताव रद्द […]
केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय.
केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात येणार असून त्याआधारे योग्य त्या सुधारणांचा मसूदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करण्यात येईल व त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य […]
आज अहमदनगर जिल्ह्यात ४७३ रुग्णांना डिस्चार्ज तर ६७४ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७४ […]
आजचा न्यायालयाचा निकाल हा प्रभूरामावर असलेल्या श्रद्धेचा विजय आहे: माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी
“अयोध्येत आता प्रत्यक्ष प्रभूराम मंदिराचे काम सुरु होत झाले. ही बातमी ताजी असतांना सर्व नेत्यांना सीबीआय विशेष न्यायालयाने निर्दोष सोडल्याची दुसरी आनंदाची बातमी आज मिळाली आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी गेल्या २७ वर्षापासूनचा संघर्ष आता पूर्ण होत आहे. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतात हे आंदोलन भाजपने सुरु केले होते. यात नगरहून मोठ्या प्रमाणात भाजपाचे […]
पुणे ‘स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम’ची चौथी बैठक पार.
‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या ‘स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम’ची चौथी बैठक आज पार पडली. ऑनलाइन पार पडलेली ही बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे योग्य प्रकारे नियोजन करावे, तसेच स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या […]