‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या ‘स्मार्टसिटी ॲडव्हायझरी फोरम’ची चौथी बैठक आज पार पडली. ऑनलाइन पार पडलेली ही बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
           यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे योग्य प्रकारे नियोजन करावे, तसेच स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामं दर्जेदार होण्याकडं लक्ष द्यावं अशी सूचना केली. त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेली ‘कमांड कंट्रोल रुम’ अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.
          मा.अजित पवार यांनी ‘कोरोना’ संकटाचा सामना करत असताना स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असणाऱ्या सर्व प्रकल्पांची कामं मुदतीत पूर्ण करावीत, याचबरोबर देशपातळीवर पुणे स्मार्ट सिटीचे रँकींग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपस्थितांना दिले.

आणखी बातम्या

MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे.

नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.

कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.