कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भालगावच्या सरपंच डॉक्टर मनोरमा खेडकर तसेच परिसरातील शेतकरी, व्यावसायिक यांनी खासदार मा.सुजयजी विखे व आमदार मा.मोनिका ताई राजळे यांना एका निवेदना द्वारे दिला. यासाठी त्यांनी खालीलप्रमाणे निवेदन दिले आहे.
           पाथर्डी तालुक्यातुन जात असलेला कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्हयातून पाथर्डी खरवंडी मार्गे जाऊन पुढे तो मादळमोही जवळ बीड औरंगाबाद या महामार्गाला मिळतो. या रस्त्याचे नगर ते मादळमोही हे अंतर ११२ कीमी आहे त्यापैकी फक्त भुतेटाकळी ते मादळमोही रस्त्याचे जवळपास ५० की.मी. चे काम पूर्ण झाले असुन ऊर्वरित ६२ किमी अद्याप बाकी आहे. तरीही बडेवाडी येथे टोलनाका उभारून दिनांक १ सप्टेंबर २०२० पासुन मालवाहतूक तसेच सर्व प्रवाशी वाहनांकडून टोल वसुल करण्यात येत आहे. या संदर्भात भालगाव सरपंच आणि टोलनाक्याच्या परिसरातील शेतकरी / व्यावसायिक खालील प्रमाणे निवेदन देत आहोत.
           १. केद्र शासनाच्या वने आणि पर्यावरण मंत्रालय २००६ च्या अधिसूचनेनुसार या महामार्गासाठी पर्यावरण विषयक जाहीर सुनावणी घेऊन, पर्यावरण विषयक अनुमती घेतल्या नंतरच महामार्गाचे काम सुरु करणे आवश्यक होते परंतु ती न घेता काम करण्यात येत आहे.
           २. या महामार्गाच्या काम करताना मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यात आली परंतु अद्याप नियमानुसार वृक्षलागवड करण्यात आली नाही.
           ३. या रस्त्यावर ज्या ठिकाणी अद्याप काम झाले नाही त्या ठीकाणी मोठ मोठे खडे पडलेले असुन त्यामुळे सातत्याने अपघात होऊन मनुष्यहानी होऊन वाहनांचे नुकसान होत आहे.
           ४. हा महामार्ग खरवंडी जवळ आल्या नंतर तेथुन लोहा कंधार नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग ३६१एफ हा खरवंडी कासार -मालेवाडी -मुगुंसवाडे- भालगाव-नवगण राजुरी असा एकुण ३६ कि मी चा महामार्ग जात आहे.त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया चालु आहे, तसेच अनेक ठिकाणी काम सुरु आहे. परंतु मालेवाडी, श्रीपतवाडी, मुगुसवाडे, एकनाथवाडी, भालगाव या गावातील नागरिकांना हालआपेष्टा सहन करत याच रस्त्याने गेल्या शिवाय पर्याय नाही. तसेच या लोकांना टोलनाका दोन रस्त्याच्या फाट्याच्या मागे फक्त २ की.मी. वर आसल्याने या फाट्यापासुन पुढे न जाताही पुढील ४० कि.मी. अंतराचा टोल भरावा लागतो.
          
वरील सर्व बाबीचा विचार करून खालील गोष्टीची मागणी करण्यात येत आहे.

           १.कल्याण विशाखापट्टणम या नगर जिल्ह्यातून जाणा-या महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ३६१F या महामार्गासाठी ताबडतोब पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी घेऊन पर्यावरणविषयक अनुमती प्राप्त करून घ्यावी. तो पर्यंत या रस्त्याचे काम आणि टोल वसुली थांबवण्यात यावी.
           २.कोणत्याही रस्त्याचा टोल हा अंतरानुसार ठरविण्यात येतो. टोल नाका उभारताना जे वाहने सदरील रस्त्याचा वापर करतात त्यांच्याकडुनच वसुल होईल अशा पद्धतीने टोल प्लाझा उभारला जातो. बडेवाडी या ठिकाणी उभारण्यात आलेला टोलनाका हा दोन टोल नाक्यामधील अंतराचा विचारकरून उभारलेले दिसतो परंतु अवघ्या दोन कीमी वर दुसरा राष्ट्रीय महामार्ग सुरू होतो याचा विचार केला नाही. त्यामुळे फक्त २ कि.मी. रस्त्याचा वापर करणा-या नागरिकांना पुढील ४०-५० की.मी. चा टोल भरावा लागणे हे अयोग्य आहे. त्यामुळे हा टोलनाका दोन्ही महामार्गाच्या पाट्या नजिक उभारुन राष्ट्रीय लोहा – कंधार – नदिड महामार्ग क्रमांक ३६१F या महामार्गावरून जाणा-या सर्व वाहनाना हा महामार्ग पुर्ण होईपर्यंत कोणताही टोल अकारू नये.
           ३.सदरील महामार्गाच्या काम होई पर्यंत तर टोल अकारूच नये परंतु जेव्हा तो पूर्ण होऊन आकारला जाईल तेव्हा तो फक्त मालवाहतूक करणा-या वाहनालाच आकारला जावा.
           ४. पर्यावरण अनुमती घेतल्या नंतर त्या मधील सर्व अटी आणि शर्तीची त्वरित पुर्तता करण्यात यावी.
           ५. रस्ता करताना कीती झाडे तोडण्यात आली त्याची माहिती त्वरीत जाहीर करून लगेचच नवीन झाडांची लागवड करण्यात यावी.
           ६. पर्यावरण विषयक सर्व नियमांची पुर्तता करून उर्वरित रस्त्याचे काम त्वरेने पुर्ण करण्यात यावे.
           वरील सर्व बाबीची पूर्तता लवकरात लवकर करावी आणि खरवंडी पाण्यापासून प्रस्तावित लोहा-कंधार-नांदेड मार्गाने जाणा-या सर्व वाहनांकडुन वसुल करण्यात येत आसलेल्या टोल त्वरीत थांबवावा अन्यथा सनदशीर मार्गाने रस्ता रोको वा अन्य प्रकारची आंदोलने करण्यात येतील आणि हरीत न्यायालयात रितसर तक्रार दाखल करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. या निवेदानावर भालगावच्या सरपंच डॉक्टर मनोरमा खेडकर तसेच परिसरातील शेतकरी, व्यावसायिक यांनी सह्या केलल्या आहेत.

आणखी बातम्या

स्नेहालय उचल फाउंडेशन च्या वतीने गरजू महिलांना आटा चक्कीचे वाटप.

अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना डिस्चार्ज तर ४०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

अहमदनगर महापालिका: अखेर पाच स्वीकृत नगरसेवकांची झाली निवड

कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया।