पाथर्डी येथील रहिवासी व सध्या सातारा तहसीलदार पदी कार्यरत असलेल्या जयश्री घुले (आव्हाड) यांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली.
           जयश्री घुले यांनी २००६ साली राहुरी विद्यापीठातुन एम.एस्सी अॅग्री पर्यंत शिक्षण घेतले असुन, सामान्य परिस्थिती मधून आपले शिक्षण पूर्ण करून कुठला ही क्लास न करता चिकाटी, आत्मविश्वास व कुटुंबाची साथ आशा परिस्थितीत जिद्दीने प्रयत्न केले व त्यांची राज्यलोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात २००९ साली तहसीलदार म्हणून निवड झाली. तहसीलदार म्हणून त्यांची पहिली नियुक्ती सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाली.
           तसेच त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून काम केले. प्रशासकीय सेवेत उल्लेखनिय कार्य केल्याने आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. आता त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल जनआधार सामाजिक संघटनेने त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अशी महिती हरिष जायभाये यांनी दिली.

आणखी बातम्या

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपी विशेष सीबीआय न्यायालयातून निर्दोष मुक्त.

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय.

हाथरस की घटना के बाद सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई ने युपी सरकार पर साधा निशाणा.

आजचा न्यायालयाचा निकाल हा प्रभूरामावर असलेल्या श्रद्धेचा विजय आहे: माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी