खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी नुकताच कर्जत तालुक्याच्या दौरा केला या दरम्यान त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. दौऱ्यादरम्यान तोरकडवाडी (ता. कर्जत) येथे जि. प. अहमदनगर यांच्या वतिने बांधलेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन केले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध प्रकल्पांचा आढावा घेतला.
          याच दौऱ्यादरम्यान कर्जत येथील उप जिल्हा रुग्णालयाला भेट दिली, तसेच येथील कोविड सेंटर ची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांसोबत कोविड सेंटरच्या सोयीसुविधा या बाबत आढावा घेतला. डॉ.सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे राक्षाई मंदिर कलशरोहण समारंभात सहभाग घेतला. जलालपूर येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच कर्जत नगरपंचायतच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत सुरु असलेल्या “स्वच्छ महाराष्ट्र श्रमदान” शिबीरात आपला सहभाग नोंदवला.
          खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या दौऱ्यादरम्यान नगराध्यक्ष श्री. नामदेव राऊत, अशोक खेडकर, सरपंच श्री. निलेश धुमाळ, उपसरपंच श्री. सुखदेव भीताडे, श्री. प्रसाद ढोकरीकर, श्री. दादासाहेब सोनमाळी, श्री. विक्रमराजे भोसले डॉ. यादव, पी. आय. माने आदी मान्यवर व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

आणखी बातम्या

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय.

नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.

अहमदनगर महापालिका: अखेर पाच स्वीकृत नगरसेवकांची झाली निवड

कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया।