अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४४६७ इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२८ आणि अँटीजेन चाचणीत ३७७ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१,अकोले १२, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहुरी ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५७,अकोले ०८, जामखेड ०५, कर्जत ०५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण २६, नेवासा १३, पारनेर १३, पाथर्डी ०५, राहाता १२, राहुरी २०, संगमनेर २७, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३७७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ३२, अकोले १८, जामखेड ३०, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ५२, नेवासा ४०, पारनेर ११, पाथर्डी १९, राहाता ३६, राहुरी १६, संगमनेर ३९, शेवगाव २१, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज ४७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १०२, अकोले ५२, जामखेड ३५, कर्जत १९, कोपरगाव २३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर १२, पाथर्डी २२,, राहाता ५०, राहुरी १२, संगमनेर २७, शेवगाव २२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ०५, मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: ३८८३८
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ४४६७
   मृत्यू: ७१८
   एकूण रूग्ण संख्या: ४४०२३

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आणखी बातम्या

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपी विशेष सीबीआय न्यायालयातून निर्दोष मुक्त.

सुखकर्ता कॉलनी, सावेडी येथील नागरिकांचे विविध समस्यांबाबत नगरसेविका यांना निवेदन.

हाथरस की घटना के बाद सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई ने युपी सरकार पर साधा निशाणा.

आजचा न्यायालयाचा निकाल हा प्रभूरामावर असलेल्या श्रद्धेचा विजय आहे: माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी