“अयोध्येत आता प्रत्यक्ष प्रभूराम मंदिराचे काम सुरु होत झाले. ही बातमी ताजी असतांना सर्व नेत्यांना सीबीआय विशेष न्यायालयाने निर्दोष सोडल्याची दुसरी आनंदाची बातमी आज मिळाली आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी गेल्या २७ वर्षापासूनचा संघर्ष आता पूर्ण होत आहे. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतात हे आंदोलन भाजपने सुरु केले होते. यात नगरहून मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्व कारसेवकांवर व नेत्यांवर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे सर्व जनता व्यथित झाली होती. आज सर्वांना निर्दोष सोडण्यात आल्याने ही व्यथा दूर झाली आहे. आजचा निकाल हा प्रभूरामावर असलेल्या श्रद्धेचा विजय आहे. म्हणून आजचा दिवस माझ्या आयुष्यातील आनंदाचा आहे. ज्यांनी ज्यांनी या आंदोलनात भाग घेऊन प्रभूरामाचे कार्य केले त्यासर्व नेत्यांचे व कारसेकांचे अभिनंदन” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले.
           लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांच्या घरा समोर फाटके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. तसेच लाडू वाटून सर्वांचे तोंड गोड केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष नवनीत सुरपुरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक बाबर, जी. प. च्या माजी सदस्य सौ. बाबर, नूरमहंमद सय्यद, संतोष सावळे, अविनाश साखला, नितीन जोशी, लक्ष्मिकांत तिवारी, रोषण गांधी, केदार लाहोटी, युवराज नवसारीकर, मल्हारी दराडे, लक्ष्मन बोठे, बाळासाहेब पोटधन आदि उपस्थित होते.

आणखी बातम्या

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपी विशेष सीबीआय न्यायालयातून निर्दोष मुक्त.

सुखकर्ता कॉलनी, सावेडी येथील नागरिकांचे विविध समस्यांबाबत नगरसेविका यांना निवेदन.

हाथरस की घटना के बाद सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई ने युपी सरकार पर साधा निशाणा.

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.