महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी करा.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने ज्या भागात रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत, तेथील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचून तात्काळ उपचार देता येत आहेत. प्रशासन आणि आरोग्य विभागाची ही लक्ष्य निर्धारित करुन चाचण्यांची पद्धत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. त्याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक […]
महाराष्ट्र जमीन महसूल 1971 मध्ये सुधारणाबाबत हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 (1966 चा महाराष्ट्र अधिनियम 41) याच्या कलम 328, च्या पोट कलम (1) व पोट कलम (2) चे खंड (चार), (दहा), (चौदा) आणि (त्रेसष्ठ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्या बाबत समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मध्ये […]
उद्योग आधार ऐवजी आता उद्यम नोंदणी आवश्यक
सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांसाठी उद्योग आधाराच्या ऐवजी नव्याेने उद्यम नोंदणी करावी लागणार आहे. दिनांक 1 जूलैपासुन ही नोंदणी सुरू झाली असून, त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. या काळात प्रत्येक सूक्ष्म, लघु, मध्यम तथा मोठ्या उद्योगांना या अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी सर्व उद्योग आधार रद्द होणार […]
राज्य सरकारने राज्यातील सामान्य जनतेचे २४० कोटी रुपये परत द्यावे.
राज्य सरकारने करोना काळात रुग्णाच्या ज्या आर. टी. पी. सी. आर. टेस्ट करण्यासाठी खाजगी लॅबला जादा दर ठरून दिल्या मुळे सामन्य जनतेला २४० कोटी रुपयाचा फटका बसलेला असून, राज्य सरकारने त्याची भरपाई करावी. अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. आर. टी. पी. सी. आर. टेस्ट करण्यासाठी […]
जिल्ह्यात आज तब्बल ९०९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, तर ७८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १० सप्टेंबर २०२०, रात्री ८ वाजेपर्यंत ९०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
करोनाचा धसका, पुरोहित मंडळाने घेतला ‘हा’ निर्णय.
अहमदनगर मध्ये करोना बाधितांचे मृत्यू होत असतानाच, नैसर्गिक मृत्यूही सुरूच आहे. अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी नगर शहरातील अमरधाम अपुरे पडत आहे. आता तर दशक्रिया विधी साठीही नातेवाईक यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला आहे. करोनाच्या कारणास्तव अहमदनगरच्या पुरोहित संघटनेने पुढील पधंरा दिवस (दी. १४/०९/२०२० पासुन दी.२९/०९/२०२०) अमरधाम येथील दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे […]
पालकमंत्री शोधुन द्या मुख्यमंत्री यांना पत्र.
अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना लिहण्यात आले आहे. पत्रामध्ये मनविसे लिहले आहे कि, नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात करोना ने आकार वाढवला असुन नगरचे पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ हे हरवले आहेत. जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांसाठी जनता करफ्यु लावावा यासाठी अनेक सामाजिक संस्था […]
या पुढे अभिनेत्री कंगना राणावत हिचा कुठलाही चित्रपट नगरला प्रदर्शित होऊ देणार नाही.
अभिनेत्री कंगना राणावत हिने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसेना पक्षाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल रात्री नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवक यांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आज पुन्हा चितळे रोडवरील नेताजी सुभाष चौकात कंगना राणावतचा […]
एमएच सीईटी परीक्षा 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर
बारावीच्या विद्यार्थ्यांना फार्मसी व अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतली जाणारी एमएच सीईटी परीक्षा वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा ‘महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ’ विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या तर्फे दरवर्षी मे महिन्यात घेतली जाते. यावर्षी आलेल्या कोविड संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता परीक्षा बाबत चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज.
अहमदनगर जिल्ह्यात आज ०९ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७६६ ने […]