बारावीच्या विद्यार्थ्यांना फार्मसी व अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतली जाणारी एमएच सीईटी परीक्षा वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा ‘महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ’ विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या तर्फे दरवर्षी मे महिन्यात घेतली जाते.
           यावर्षी आलेल्या कोविड संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता परीक्षा बाबत चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून नवीन तारखे प्रमाणे पी.सी.बी. ग्रुपची परीक्षा ही १ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर व पीसीएम ग्रुप साठी ची परीक्षा १२ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत घेतली जाणार आहे. या बाबत ची सूचना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंडळ विभागातर्फे जाहीर करण्यात आली असून
           विद्यार्थींनी याबाबत अधिक माहितीसाठी www.mahacet.org या वेबसाईट वर भेट द्यावी असे नमूद केले आहे.

आणखी बातम्या

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार ?

आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही.

अहमदनगर जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी पूर्ण.

जिल्हा मंडप व व्यवसायिक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन