महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 (1966 चा महाराष्ट्र अधिनियम 41) याच्या कलम 328, च्या पोट कलम (1) व पोट कलम (2) चे खंड (चार), (दहा), (चौदा) आणि (त्रेसष्ठ ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व त्या बाबत समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, 1971 मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत. या नियमांचा मसुदा नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला असून तो पुन्हा प्रसिद्धीस देण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
           यानुसार, सदर मसुदा पुढीलप्रमाणे असेल. – या नियमांना “महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (द्वितीय सुधारणा) नियम 2020” असे म्हणावे. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हे वाट करणे) नियम 1971 मधील नियम 11 च्या पोट नियम (5) मध्ये शब्द आणि अंकात, रूपये 35,000 या मजकुराऐवजी रूपये 8,00,000 हा मजकूर दाखल करण्यात येईल.
           याबाबत नागरिकांकडून महाराष्ट्र शासनाचे अप्पर मुख्य सचिव (महसूल) व वनविभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई 400032, यांचेकडे प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे.

आणखी बातम्या

राज्य सरकारने राज्यातील सामान्य जनतेचे २४० कोटी रुपये परत द्यावे.

महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी करा

करोनाचा धसका, पुरोहित मंडळाने घेतला ‘हा’ निर्णय.

उद्योग आधार ऐवजी आता उद्यम नोंदणी आवश्यक