अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १० सप्टेंबर २०२०, रात्री ८ वाजेपर्यंत ९०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.२८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०८० इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २०४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५८ आणि अँटीजेन चाचणीत ३१९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५६, संगमनेर २८, राहता ०३, पाथर्डी २१,, नगर ग्रामीण ०७, श्रीरामपूर ०८, कॅंटोन्मेंट २१, नेवासा १०, श्रीगोंदा ०५, पारनेर ०८, राहुरी ०२, शेवगाव १३, कोपरगाव ०१, जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पिटल १७, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
          खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २५८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७९, संगमनेर १६, राहाता ३५, पाथर्डी ०८, नगर ग्रामीण २७, श्रीरामपुर ०७, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०८, श्रीगोंदा ०३, पारनेर ३२,अकोले ०७, राहुरी २०, शेवगाव ०१, कोपरगांव ०८, जामखेड ०२ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
          अँटीजेन चाचणीत आज ३१९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ८६, संगमनेर ३७, राहाता १८, पाथर्डी १७, श्रीरामपूर २२, नेवासा ३८, श्रीगोंदा २६, पारनेर १६, अकोले ०९, शेवगाव १६, कोपरगाव १५, जामखेड ०५ आणि कर्जत १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
          दरम्यान, आज ९०९ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा ३२२, संगमनेर ७१, राहाता ५९, पाथर्डी २१, नगर ग्रा.९५, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट १३, नेवासा ५५, श्रीगोंदा ३२, पारनेर २०, अकोले ३७, राहुरी ४३, शेवगाव १४, कोपरगाव २६, जामखेड १७, कर्जत १३, मिलिटरी हॉस्पिटल १० आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: २४१५०
   उपचार सुरू असलेले रूग्ण:४०८०
   मृत्यू:४२६
   एकूण रूग्ण संख्या:२८६५६

आणखी बातम्या

या पुढे अभिनेत्री कंगना राणावत हिचा कुठलाही चित्रपट नगरला प्रदर्शित होऊ देणार नाही.

एमएच सीईटी परीक्षा 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर

करोनाचा धसका, पुरोहित मंडळाने घेतला ‘हा’ निर्णय.

आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही.