अहमदनगर मध्ये करोना बाधितांचे मृत्यू होत असतानाच, नैसर्गिक मृत्यूही सुरूच आहे. अशा परिस्थितीत अंत्यविधीसाठी नगर शहरातील अमरधाम अपुरे पडत आहे. आता तर दशक्रिया विधी साठीही नातेवाईक यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला आहे. करोनाच्या कारणास्तव अहमदनगरच्या पुरोहित संघटनेने पुढील पधंरा दिवस (दी. १४/०९/२०२० पासुन दी.२९/०९/२०२०) अमरधाम येथील दशक्रिया विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची महिती पुरोहित मंडळाचे जिल्हा अध्यक्ष किशोर जोशी यांनी प्रसिद्धीस केलेल्या पत्रात महिती दिली.
           अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळाचे केलेल्या पत्रामध्ये जोशी यांनी सांगितले की, अहमदनगर अमरधाम येथील दशक्रिया विधी सोमवार दिनांक १४/०९/२०२० पासुन दी. २९/०९/२०२० पर्यंत पुरोहित महामंडळाकडून कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही. अमरनाथ येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित करोना पॉझिटिव निघाले असून अनेक जण आजारी आहे. एक दोन पुरोहितांच्या मृत्यू झाला आहे. तर काही पुरोहितांच्या मुलांचे मृत्यू झाले आहेत. विधीस उपस्थित असणारे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती लपवत आहेत. तर काही जण विधीला फक्त आमची घरची माणसे असणार आहे, असे सांगतात परंतु प्रत्यक्षात 50 ते 70 लोक असतात, अनावश्यक गर्दी केली जाते, विधी करण्याकरता पुरोहितान वर दबाव आणला जातो, सध्या जिल्ह्यात दररोज करोनाचे ७५० ते ८०० रुग्ण सापडत आहेत. अंदाजे रोज १८ ते २० लोकांचा करोना आजाराने मृत्यू होत आहे. आदी बाबींचा विचार करून अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळाने, दिनांक १४/०९/२०२० पासुन दी. २९/०९/२०२० पर्यंत कोणतेही धार्मिक विधी अमरधाममध्ये केले जाणार नाही असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. अशी माहिती पुरोहित मंडळाचे जिल्हा अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली आहे.

आणखी बातम्या

या पुढे अभिनेत्री कंगना राणावत हिचा कुठलाही चित्रपट नगरला प्रदर्शित होऊ देणार नाही.a>

एमएच सीईटी परीक्षा 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर

पालकमंत्री शोधुन द्या मुख्यमंत्री यांना पत्र.

आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही.