कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने ज्या भागात रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत, तेथील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचून तात्काळ उपचार देता येत आहेत. प्रशासन आणि आरोग्य विभागाची ही लक्ष्य निर्धारित करुन चाचण्यांची पद्धत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. त्याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खासगी रुग्णालयातून आकारल्या जात असलेल्या शुल्काचे प्री-ऑडिट करण्याची सूचना त्यांनी केली.
           विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती तसेच महसूल विषयक बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आरोग्य उपसंचालक डॉ. पट्टणशेट्टी, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदींसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
           यावेळी श्री. गमे यांनी जिल्ह्यातील कोरोना बाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. कोणत्या भागातून किती रुग्ण येत आहेत, रुग्ण वाढण्याची कारणे, कोणत्या वयोगटातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हेल्थ सेंटर आदींची माहिती, जिल्ह्यात असणारी व्हेंटिलेटरची उपलब्धता आदींची माहिती घेतली. याशिवाय, खासगी प्रयोगशाळांतून केली जाणारी कोरोना तपासणी,कोविड चाचण्या आणि आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण आदींची माहितीही त्यांनी घेतली.

आणखी बातम्या

राज्य सरकारने राज्यातील सामान्य जनतेचे २४० कोटी रुपये परत द्यावे.

उद्योग आधार ऐवजी आता उद्यम नोंदणी आवश्यक

करोनाचा धसका, पुरोहित मंडळाने घेतला ‘हा’ निर्णय.

महाराष्ट्र जमीन महसूल 1971 मध्ये सुधारणाबाबत हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन