अहमदनगरचे पालकमंत्री हरवले आहेत, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना लिहण्यात आले आहे. पत्रामध्ये मनविसे लिहले आहे कि, नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात करोना ने आकार वाढवला असुन नगरचे पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ हे हरवले आहेत. जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांसाठी जनता करफ्यु लावावा यासाठी अनेक सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी सतत मागणी केली परंतु मा. हसन मुश्रीफ यांना अहमदनगर नियंत्रणात आहे असे वाटते. परंतु जिल्यात रोज 800 करोना रुग्ण मिळत असून अमरधाममध्ये मृत्यू झालेल्यांना अंत्यविधीसाठी जागा सुद्धा भेटत नाही. एका दिवसात नगर शहरातील अमरधाम याठिकाणी 22 जणांची अंत्यविधी एका यावेळी करण्यात आले. मध्यंतरी तर जिल्हा रुग्णालयातील स्वॅब घेण्यासाठी किट संपले होते, बरेच लोकांना दोन-तीन दिवस वाट पाहावी लागत आहे
           नगरचे पालकमंत्री नगर ला फक्त मीटिंग घेण्यासाठी येतात परंतु त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल व अमरधाम या ठिकाणी किती भेटी दिल्यात. मृत्यूचा आकडा हा १२०० पुढे गेला आहे परंतु प्रशासन खोटे आकडे देण्यात पटाईत आहे. आपणास नम्र विनंती आहे की अहमदनगरचे पालकमंत्री माननीय हसन मुश्रीफ हरवले असून, त्यांना शोधून द्यावे. असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष श्री. रमेश सुरेश पुरोहित यांनी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना लिहले आहे.

आणखी बातम्या

या पुढे अभिनेत्री कंगना राणावत हिचा कुठलाही चित्रपट नगरला प्रदर्शित होऊ देणार नाही.

एमएच सीईटी परीक्षा 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार ?

आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही.