दिल्ली मध्ये बीकेआय संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक
दिल्ली मध्ये BKI (बब्बर खालसा इंटरनॅशनल) संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना उत्तर पश्चिम दिल्ली भागात अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी हे बीकेआय या संघटनेशी संबंधित असून अटकेपूर्वी पोलिस व दहशतवाद्यांना मध्ये गोळीबार झाला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व दारूगोळा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी पंजाबमधील काही प्रकरणांमध्ये पोलिसाना हवे […]
अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत नव्या ५११ बाधितांची भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: ०६ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने वाढ […]
सक्षम पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा सेंट्रल बँकेला अभिमान – क्षेत्रीय प्रबंधक श्री एन. के. पंडा
नगर – भारतीय संस्कृतीत गुरु शिष्यांची समृद्ध परंपरा आहे. विद्यार्थ्यांना गुणवंत, ज्ञानवंत, चारित्र्यसंपन्न बनवून देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. त्या सर्व गुरुजनांचा सेंट्रल बँकेला अभिमान आहे. म्हणूनच नगर मधील जेष्ठ शिक्षकांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला आहे, असे गौरवोद्गार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक श्री […]
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश – महामार्गाच्या कामाकरीता केंद्र सरकारचा निधी मंजुर
न्हावरा, काष्टी, श्रीगोंदा, आढळगांव ते जामखेड या ५४८ डी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरीता खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील तळेगाव पासुन चाकण, शिक्रापूर, न्हावरा, काष्टी, श्रीगोंदा, माहिजळगाव, जामखेड, बीड अशा मोठ्या शहरांना जोडणारा ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गाची ओळख आहे. […]
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४४ टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: ०६ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
राज्य सरकार हे प्रशासनाच्या भरवशावर सुरू – माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
‘आपल्या जिल्ह्यातील तीन सुपूत्र हे मंत्री आहेत. ते काय करतात, हे त्यांना जिल्ह्यातील लोकांनी विचारले पाहिजे. हे मंत्री आतापर्यंत कुठे कोविड सेंटर सुरू करू शकले नाहीत. जिल्ह्यात जो करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यावर ते काही भाष्य करतात, उपाययोजना करतात हे पाहण्यास मिळत नाही. आज बारामतीत जनता कर्फ्यु आहे. स्वतः पालकमंत्र्यांच्या कागलमध्ये लॉकडाउन […]
रिया चक्रवर्ती ला NCB कडून चौकशीसाठी समन्स
रिया चक्रवर्ती ला NCB कडून चौकशीसाठी समन्स काढण्यात आले असून ती चौकशीसाठी उपस्थित राहून त्याचा आदर करेल अशी अपेक्षा NCB मुंबई चे झोनल डायरेक्टर श्री. समीर वानखेड यांनी व्यक्त केली. अशी महिती ANI ने Twetter वर प्रसिध्दकेली आहे. We have summoned her (#RheaChakroborty). She will come respecting the summon: NCB Zonal Director, Sameer […]
रेल्वे भर्ती परीक्षा १५ डिसेंबर २०२० पासून पुर्ववत होणार.
कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर स्थगित असलेल्या रेल्वे भर्ती परीक्षा १५ डिसेंबर २०२० पासून पुर्ववत होणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी Twitter द्वारे दिली. ३ प्रकारच्या विविध श्रेणी अंतर्गत १,४०,६४० पदांची भरती केली जाणार असून यासाठी २,४२,००,००० अर्जांची प्राप्ती झाली असून अर्जांची छाननी प्रकिया पुर्ण झाली आहे. कोविड संकटामुळे परीक्षा स्थगित असलेल्या या […]
त्रिमुर्तींनी कोविड सेंटरची उभारणी केली – प्रांत संघचालक नानासाहेब जाधव
“मनपा, भाजप व दीनदयाळ पतसंस्था या त्रिमुर्तींनी कोविड सेंटरची उभारणी केली आहे. यातून चांगले कार्य निश्चितच होईल. भाजपने आता घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती व प्राथमिक तपासण्यासाठी पुढाकार घ्यावा” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले. महापालिका, नगर शहर भाजप व पंडीत दिनदयाळ पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने नटराज कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. तर, माजी मंत्री […]
अहमदनगर जिल्ह्यात २१ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले घरी
अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने वाढ झाली. यामुळे उपचार […]