नगर – भारतीय संस्कृतीत गुरु शिष्यांची समृद्ध परंपरा आहे. विद्यार्थ्यांना गुणवंत, ज्ञानवंत, चारित्र्यसंपन्न बनवून देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. त्या सर्व गुरुजनांचा सेंट्रल बँकेला अभिमान आहे. म्हणूनच नगर मधील जेष्ठ शिक्षकांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला आहे, असे गौरवोद्गार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक श्री एन. के. पंडा यांनी काढले
हे पण वाचा: खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश – महामार्गाच्या कामाकरीता केंद्र सरकारचा निधी मंजुर
शिक्षक दिनाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने क्षेत्रीय प्रबंधक एन. के. पंडा यांनी नगर मधील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे सेवा निवृत्त शिक्षक एस. आर. जोशी आणि अनंत दसरे यांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. बँकेच्या वरिष्ठ अधिकारी जयश्री डावरे आणि उपव्यास्थापक पांडुरंग कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्याच्या आर्थिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सेंट्रल बँके तर्फे सामाजिक जाणिव ठेवून शिक्षकांचा सन्मान केल्याबद्दल दोन्ही शिक्षकांनी बँकेचे कौतूक करून आभार मानले.