न्‍हावरा, काष्‍टी, श्रीगोंदा, आढळगांव ते जामखेड या ५४८ डी राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या कामाकरीता खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रयत्‍नांमुळे केंद्र सरकारने २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे.

अहमदनगर व पुणे जिल्‍ह्यातील तळेगाव पासुन चाकण, शिक्रापूर, न्‍हावरा, काष्‍टी, श्रीगोंदा, माहिजळगाव, जामखेड, बीड अशा मोठ्या शहरांना जोडणारा ५४८ डी या राष्‍ट्रीय महामार्गाची ओळख आहे. या रस्‍त्‍याच्‍या ८३.५५० ते १३२.६०० भाग न्‍हावरा, श्रीगोंदा, अढळगाव व ४८.५० कि.मी लांबीचे काम मंजुर झाले असून त्‍याकरीता केंद्र शासनाने २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर केला असल्‍याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले. या कामात रस्‍त्‍याच्‍या ४८.५० कि.मी लांबीमध्‍ये अस्तित्‍वातील कॉंक्रींट रस्‍त्‍याचे नवीन बांधकाम, घोड नदीवरील पुलाचे रुंदीकरण करणे व आवश्‍यक ठिकाणी लहान पुल, स्‍लॅब कल्‍व्‍हर्ट व पाईप मो-यांच्‍या कामाचा समावेश असुन गावातील लांबीत कॉंक्रीट गटार व फुतपाट बांधणे आदि कामे या निधीतून होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा- राज्य सरकार हे प्रशासनाच्या भरवशावर सुरू – माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वरील रस्‍त्‍याच्‍या मंजुर ४८.५० कि.मी लांबीपैकी काष्‍टी ते आढळगाव ही २२.५० कि.मी लांबी अहमदनगर जिल्‍ह्यातील दक्षिण लोकसभा मतदार संघात येते. या रस्‍त्‍यामुळे जिल्‍ह्यातील जामखेड, श्रीगोंदा, कर्जत तालुक्‍यातील जनतेला पुणे,मुंबई या शहरांकडे जाण्‍यासाठी जवळचा मार्ग उपलब्‍ध होईल या प्रकल्‍पाचे काम २०१९ पासुन सुरु झाले असून, सद्यस्थितीत रस्‍त्‍याच्‍या न्‍हावरा ते इनामगाव भागामध्‍ये हे काम प्रगतीपथावर आहे. नगर जिल्‍ह्यातील लांबीमध्‍ये लवकरच काम सुरु होईल अशी माहीती राष्‍ट्रीय महामार्ग उपविभागातील अभियंता दिलीप तारडे यांनी सांगितले.