मुंबई, चेन्नईसह 16 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे.
प्राप्तिकर विभागाने, आयटी सेझ विकासकचे माजी संचालक आणि चेन्नईतील स्टेनलेस-स्टीलचे प्रमुख पुरवठादार यांच्याशी संबंधित चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि कुडलोर येथील 16 ठिकाणी २७.११.२०२० रोजी छापे टाकले. यात माजी संचालक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गेल्या ३ वर्षात सुमारे १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे पुराव्यामध्ये निष्पन्न झाले आहे. एका निर्माणाधीन प्रकल्पात आयटी सेझ विकासकाने काम […]
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना रनौतच्या प्रकरणी मुंबई महापालिकेला फटकारले.
अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्र्यातील कार्यालयाच्या अतिक्रमण तोडफोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले. कंगनाच्या इमारती वर केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवत, बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली. कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर ९ सप्टेंबरला मुंबई महापालिकेने कारवाई केली होती याविरुद्ध कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर कोर्टाने कारवाईस स्थगिती देण्याचे आदेश दिले, आणि […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना डिस्चार्ज तर ३८५ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १८ ऑक्टोबर २०२०, रोजी रात्री ७ वाजेपर्यंत ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
चिंता वाढली आज अहमदनगर जिल्ह्यात १०३८ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३८ […]
कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया।
कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी आज अपने कार्यकर्ताओं के साथ हाथरस गैंगरेप पीड़िता के परिजनों से मिलने जा रहे थे। तभी उनको उत्तर प्रदेश पुलिस ने ग्रेटर नोएडा पर रोक दिया गया । लेकिन राहुल गांधी और प्रियंका गांधी अपनी जिद पर अडिक रहे और पैदल मार्च कर के हाथरस की […]
बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपी विशेष सीबीआय न्यायालयातून निर्दोष मुक्त.
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय लखनौ यांनी आज निकाल दिला असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांच्या सहित सर्व ३२ आरोपी यांना निर्दोष मुक्त केले आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी आज ३० […]
अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनचे मनोमिलन, अखेर राष्ट्रवादीचे कोतकर ‘स्थायी’चे सभापती.
अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अखेर राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची निवड झाली. वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार अखेर शिवसेनेनेचे उमेदवार मा. योगीराज गाडे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली. आज जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल […]
अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ४४८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २१ सप्टेंबर २०२०, रात्री ७.०० वाजेपर्यंत ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०५ ने […]
केंद्र सरकारचे निर्णय हे शेतकऱ्याच्या व सर्वसामान्यांच्या विरोधी- महसूलमंत्री
केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी आहे. अशी टीका महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांनी आज केली. मा. बाळासाहेब थोरात हे आज नगर शहर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाची कॉंग्रेस तर्फे नगर शहरात सुरवात करण्यात आली. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी व दुधाची भुकटीची आयात […]
अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफ करोना पॉझिटिव्ह.
कालच जिल्हा आढावा बैठकी निमित्त अहमदनगरच्या दौऱ्यावर असलेले अहमदनगरचे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफ यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तशी महिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी असा सल्ला दिला आहे. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून […]