१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय लखनौ यांनी आज निकाल दिला असून त्यात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांच्या सहित सर्व ३२ आरोपी यांना निर्दोष मुक्त केले आहे.
           सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी आज ३० सप्टेंबरला सर्व आरोपींना पुरावे नसल्याने आरोपातुन निर्दोष मुक्त केले आहे. कोर्ट ने संगितले समोर आलेल्या पुराव्यानुसार बाबरी मशीद तोडने ही पूर्वनियोजित कट नव्हता.
           याआधी सुनावणीच्या दिवशी सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस के यादव यांनी आज निकालाच्या दिवशी सर्व ३२ जणांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु ३२ आरोपीं पैकी ६ जण सोडून बाकी प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित होते. सीबीआय आजच्या निकालाविरूद्ध पुढे हायकोर्टात अपील करु शकते.

आणखी बातम्या

MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे.

नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.