कालच जिल्हा आढावा बैठकी निमित्त अहमदनगरच्या दौऱ्यावर असलेले अहमदनगरचे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफ यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तशी महिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी असा सल्ला दिला आहे.

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.
हसन मुश्रीफ

— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) September 18, 2020

           कालच पालकमंत्री मा.हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करोना अनुषंगाने बैठक घेतली. या बैठकीमध्ये आमदार मा.संग्राम जगताप, महापौर मा.बाबासाहेब वाकळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. राजश्री घुले यांच्यासह जिल्हाधिकारी श्री.राहुल व्दिवेदी, पोलीस अधीक्षक श्री.अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्री.श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते. तसेच बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत देखील घेतली होती.

आणखी बातम्या

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक नियुक्त.

जनऔषधि केंद्रांची संख्या १०५०० पर्यंत वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य.

अहमदनगर जिल्ह्यात आज ९२२ बाधितांची रुग्णसंख्येत भर, ८३.७८ % बरे होण्याचे प्रमाण.