केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी आहे. अशी टीका महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांनी आज केली. मा. बाळासाहेब थोरात हे आज नगर शहर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाची कॉंग्रेस तर्फे नगर शहरात सुरवात करण्यात आली.
          कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी व दुधाची भुकटीची आयात या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला व या दोन्ही विषयावर केंद्र सरकारची भूमिका यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले यावेळी बोलताना ते म्हणाले ‘सध्याची परीस्थिती मध्ये शेतकरी भरडला गेलेला आहे शेतीमालाचे नुकसान झालेले आहे. यातच केंद्र सरकारचा कांद्याची निर्यातबंदी हा निर्णय शेतकऱ्याचा दुःखावर दिलेल्या डागण्या आहेत. तसेच दुधाच्या भुकटीची आयात करण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात दुधाची भुकटीची निर्मिती थांबली आणि दुधाचे भाव कोसळले. हे सर्व केंद्र सरकारचे निर्णय हे शेतकऱ्याच्या व सर्वसामान्यांच्या विरोधी असून आम्ही त्याचा निषेध करतो’.

आणखी बातम्या

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

राहत्या घराचे छत कोसळून आखेगाव ता.शेवगाव येथे एकाचा मृत्यू.

अहमदनगर जिल्ह्यात आज ७०३ बाधितांची रुग्णसंख्येत भर.