सुजय गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर येथील “बूथ हॉस्पिटल” ला पाणी बॉटल भेट.

          युवक काँग्रेसचे अहमदनगर सोशल मीडिया प्रमुख सुजय गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील “बूथ हॉस्पिटल” ला पाणी बॉटल चे ५० बॉक्स भेट देण्यात आले.           सुजय गांधी यांनी आपल्या वाढदिवसाचा इतर वायफळ खर्च टाळत सामाजिक भावनेतून दिलेली मदत कौतुकास्पद आहे. भविष्यात देखील त्याचाकडून असे सामाजिक कार्य सुरूच राहील. पुनश्च त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.           यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८१ ने […]

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.

           लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३९ हजार ००४ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २९ कोटी ३७ लाख ७६ हजार ७८२ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.           राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २ ऑक्टोबर […]

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.

          भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या मार्गदर्शना नुसार तालुक्यात साजरी करण्यात आली.           भाजपा शेवगाव तालुका व शहर व्दारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे चे पुजन करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बापुसाहेब पाटेकर, तालुकाध्यक्ष […]

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५४ टक्के

          अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५९७ […]

श्री.अण्णासाहेब हजारे यांनी केलेल्या पाठपुरवठ्याला यश राळेगण थेरपाळ ते बेल्हे या रस्त्याचे भुमीपुजन पार.

          राळेगणसिद्धी येथील राळेगण थेरपाळ ते बेल्हे या ३९ कि.मी. रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या रस्त्याच्या विकास कार्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णासाहेब हजारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी केलेले प्रयत्न सफल झाले. व या कामाचे भूमिपूजन पार पडले. […]

राहुरी येथे कोविड-१९ केअर सेंटरचे उद्घाटन पार.

           राहुरी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणा-या कोविड-१९ केअर सेंटरचे उद्घाटन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.            यावेळी बोलत असताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी रुग्णांच्या सेवेसाठी या दोन्ही संस्थांनी घेतलेला पुढाकाराबद्दल त्यांचे […]

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

           मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत झालेल्या विविध निर्णय घेण्यात आले होते. निर्णयाप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आज, २ ऑक्टोबरला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आज संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संगमनेर येथील मराठा आंदोलक यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब […]

कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन.

          कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भालगावच्या सरपंच डॉक्टर मनोरमा खेडकर तसेच परिसरातील शेतकरी, व्यावसायिक यांनी खासदार मा.सुजयजी विखे व आमदार मा.मोनिका ताई राजळे यांना एका निवेदना द्वारे दिला. यासाठी त्यांनी खालीलप्रमाणे निवेदन दिले आहे.           पाथर्डी तालुक्यातुन जात असलेला कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्हयातून पाथर्डी खरवंडी मार्गे […]

नवीन अंगणवाडीत सुदृढ बालके घडावीत- नगरसेविका सौ.स्नेहल खोरे

           जिल्हा नियोजन समिती सदस्या, व श्रीरामपूर येथील नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांच्या पाठपुराव्याने नव्याने सुरू झालेल्या अंगणवाडीमध्ये पोषण माह सांगता समारोप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अंगणवाडी सेविका, तसेच प्रभागातील महिला भगिनी उपस्थित होत्या.           गेल्या काही वर्षांपासून परिसरात अंगणवाडी सुरू व्हावी म्हणून नागरिक मागणी करत होते. अवघ्या वर्षभरात शासकीय पातळीवर पाठपुरावा करून ही अंगणवाडी सुरू […]