मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत झालेल्या विविध निर्णय घेण्यात आले होते. निर्णयाप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी आज, २ ऑक्टोबरला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात आज संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संगमनेर येथील मराठा आंदोलक यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी नगराध्यक्षा दुर्गा तांबे तसेच त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील सहभागी झाले होते.
           यावेळी बोलताना नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, ‘माझे बंधू बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर आम्ही सर्व मराठा आंदोलक जमलेलो आहोत. थोरात यांच्याकडे माझी मागणी आहे की, मराठा आरक्षणासाठी ज्या काही त्रुटी आहेत, कमतरता आहेत, त्या लवकर दूर कराव्यात. या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कारण हा समाज विखुरलेला असून त्यांना नोकरीत स्थान मिळत नाही. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी माझ्या भावाकडे मी ओवाळणी मागत आहे.’ यावेळी आंदोलकांनी जवळपास एक तास महसूलमंत्री यांच्या घरासमोर ठिय्या मांडला होता.

आणखी बातम्या

स्नेहालय उचल फाउंडेशन च्या वतीने गरजू महिलांना आटा चक्कीचे वाटप.

कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडी येथील टोल वसुली थांबवावी अन्यथा आंदोलन.

अहमदनगर महापालिका: अखेर पाच स्वीकृत नगरसेवकांची झाली निवड

कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और प्रियंका गांधी को युपी पुलिस ने हिरासत में लिया।