अहमदनगर जिल्ह्यात आज ९२२ बाधितांची रुग्णसंख्येत भर, ८३.७८ % बरे होण्याचे प्रमाण.
अहमदनगर जिल्ह्यात आज दि. १७ सप्टेंबर२०२० रोजी, रात्री ७-३० वाजेपर्यंत ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२२ […]
नगरशहर, वार्ड क्र. ६ येथे सेवा सप्ताह निमित्त “रक्तदान शिबिर” संपन्न.
भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा सप्ताहा” च्या निमित्ताने आज अहमदनगर शहर, वार्ड क्रमांक ६ येथे सिद्धिविनायक मंदिर, सिद्धिविनायक कॉलनी, सावेडी याठिकाणी “रक्तदान शिबिर” पार पडले. तसेच, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना “व्हिटैमीन सी” च्या गोळ्यांचे वाटप व महिलांची हिमोग्लोबीन (एच. बी.) तपासणी करण्यात आली. यासाठी जनकल्याण रक्तपेढी यांचे […]
जनता कर्फ्यू बाबत निर्णयाचा चेंडू स्थानिक नेत्यांच्या कोर्टात.
आज अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करोना अनुषंगाने बैठक घेतली. या बैठकीमध्ये आमदार मा.संग्राम जगताप, महापौर मा.बाबासाहेब वाकळे यांच्यासह जिल्हाधिकारी श्री.राहुल व्दिवेदी, पोलीस अधीक्षक श्री.अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्री.श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना […]
जनऔषधि केंद्रांची संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य.
मार्च 2024 च्या अखेरपर्यंत जनऔषधि केंद्रांची संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांचा समावेश राहील. तसेच सर्व दुकानांमध्ये औषधांचे वास्तविक-वेळेत वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी आयटी-सक्षम लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. अशी महिती आज केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली. केंद्रीय मंत्री महिती […]
कांग्रेस प्रदेशअध्यक्ष मा.सत्यजित तांबे यांच्या मा . नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन अनोख्या शुभेच्छा.
आज भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा ७०वा वाढदिवस असून त्यांच्यावर देश विदेशातून नागरिक, नेते, सेलिब्रिटी हे शुभेच्छांचा वर्षाव करत असून यासाठी सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर केला जात आहे. यातच महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे प्रदेशअध्यक्ष मा. सत्यजित तांबे यांनी नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा देताना त्यांनी वाढत्या […]
नगर शहर वार्ड क्रमांक ६ येथे विविध उपक्रम संपन्न.
भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आज अहमदनगर शहर वार्ड क्रमांक ६ येथे विविध कार्यक्रम माननीय महापौर श्री बाबासाहेब वाकळे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री भय्या गंधे, उपमहापौर सौ मालन ताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले. आज नगरसेविका श्रीमती पल्लवी दत्तात्रय जाधव यांच्या तर्फे […]
मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दरेवाडी ता नगर येथे रक्तदान शिबिर सपंन्न.
मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७०व्या वाढदिवसा निमित्ताने दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी ‘दरेवाडी’, ता नगर येथे रक्तदान शिबिर सपंन्न झाले. यात मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने व भाजपा ने आयोजित केलेल्या सेवा सप्ताहत वारकरीभवन दरेवाडी या […]
कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, काँगेसच्या वतीने निवेदन.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा शेतकरी विरोधी घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून तसेच नामदार थोरात साहेब, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली […]
दिलासा नाहीच! आज रूग्ण संख्येत तब्बल ९०६ ने वाढ.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७ वाजेपर्यंत तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण […]
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!
कोविड-१९ अर्थात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपायययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि कोवीड बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीचा वापर करण्यात येत आहे. जनजागृतीच्या माध्यमातून मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी- गर्दीच्या ठिकाणी संपर्क टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा प्रबोधनात्मक माहितीवर भर देत […]