आज अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करोना अनुषंगाने बैठक घेतली. या बैठकीमध्ये आमदार मा.संग्राम जगताप, महापौर मा.बाबासाहेब वाकळे यांच्यासह जिल्हाधिकारी श्री.राहुल व्दिवेदी, पोलीस अधीक्षक श्री.अखिलेश कुमार सिंह, महापालिका आयुक्त श्री.श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.
          बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, बैठकीमध्ये महापौर आणि आमदार यांनी पुन्हा लॉकडाऊन करावा का?, असा मुद्दा मांडला. मात्र आता केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून लॉकडाऊन करणे याला विरोध केला आहे. पण स्थानिक स्तरावर जनता कर्फ्यू करु शकतो. त्यासाठी मी महापौरांना सांगितले आहे की, त्यांनी सर्व लोकांना एकत्र करून याबाबत निर्णय घ्यावा. आता केंद्र सरकारने लॉकडाऊन करायचे नाही, हा निर्णय घेतल्यामुळे प्रशासन यामध्ये भाग घेणार नाही. मात्र सर्व जनता मिळून बंद करणार असेल, तर प्रशासन सहकार्य करेल.
          त्यांनी जनता कर्फ्यु बाबत कोल्हापूरचा अनुभव सांगीतला. ते म्हणाले ‘आमच्या कोल्हापूर येथे जेव्हा जनता कर्फ्यु बाबत बैठक झाली, तेव्हा ५० टक्के लोकांनी विरोध केला, मतभेद झाले. त्यामुळे असा निर्णय घेताना एकत्र बसून घ्या. तुमचा जो निर्णय असेल त्याला पालकमंत्री म्हणून माझे सहकार्य असेल,’ आता पालकमंत्री यांच्या या भूमिकेमुळे जनता कर्फ्यू बाबत निर्णयाचा चेंडू स्थानिक नेत्यांच्या कोर्टात येऊन पडला आहे.

आणखी बातम्या

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक नियुक्त.

जनऔषधि केंद्रांची संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य.

अहमदनगर जिल्ह्यात आज ९२२ बाधितांची रुग्णसंख्येत भर, ८३.७८ % बरे होण्याचे प्रमाण.