मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७०व्या वाढदिवसा निमित्ताने दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी ‘दरेवाडी’, ता नगर येथे रक्तदान शिबिर सपंन्न झाले. यात मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
          मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने व भाजपा ने आयोजित केलेल्या सेवा सप्ताहत वारकरीभवन दरेवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यासाठी श्री स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, रा. स्व. संघ. व जनकल्यान रक्तपेढी यांचे सहकार्या लाभले.
          या वेळी भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, दरेवाडी चे सरपंच श्री अनिल करांडे, जनकल्यान रक्तपेढी चे डॉ मढीकर ऊपस्थित होते. तसेच श्री सुभाष बेरड़, श्री विजय सयाजी बेरड़ ,गोरख गवळी ,आकाश निमसे ,विट्ठल लोखंडे,प्रशांत बेरड़, अरुण सायम्बर , राजू म्हस्के, पोपट आसाराम बेरड़, सुरेश फालके, भाऊ करांडे, आविनाश सालुंके , संभाजी मोरे,सारंग सालवे,सागर जगताप, प्रमोद जगताप ,संजय कुलाल, सौ जयश्री कारांडे , सौ जगताप यांनी उपस्थित राहुन रक्तदान शिबिर यशस्वी केले.

आणखी बातम्या

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक नियुक्त.

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, सेवा सप्ताहाचे आयोजन.

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, काँगेसच्या वतीने निवेदन.