अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा शेतकरी विरोधी घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून तसेच नामदार थोरात साहेब, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली महसूलचे तहसीलदार वखारे यांना आमदार लहू कानडे यांनी निवेदन दिले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, दीप चव्हाण, ज्ञानदेव वाफारे, संपतराव म्हस्के, उबेद शेख, नलिनी गायकवाड, जरीना पठाण, अज्जू शेख, मयूर पाटोळे, दानिश शेख, गणेश भोसले, प्रवीण गीते आदी उपस्थित होते.
          लहू कानडे म्हणाले की, कांद्याला निर्यात बंदी आणणे, हा तर केंद्र सरकारने शेतकर्यांहशी केलेला द्रोह आहे. काही महत्त्वाच्या शेती उत्पादनाला अत्यावश्यक यादीतून वगळली आणि कांद्याला निर्यात बंदी आणून शेतकऱ्यांंना देशोधडीस लावण्याचे काम केंद्र सरकारने केले असल्याचा घणाघाती टीका त्यांनी केली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी अधिकच संकटात जाईल त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातबंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा काँग्रेस पक्ष शेतकरी बांधवांसह रस्त्यावर उतरेल असा इशाराही कानडे यांनी दिला.
           शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी कांद्याची निर्यातबंदी केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच कठीण परिस्थिती शेतकऱ्यासमोर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे नगरमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आणखी बातम्या

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक नियुक्त.

दि १६.०९.२०० ते १८.०९.२०२० या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा.

दिलासा नाहीच! आज रूग्ण संख्येत तब्बल ९०६ ने वाढ.