भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा सप्ताहा” च्या निमित्ताने आज अहमदनगर शहर, वार्ड क्रमांक ६ येथे सिद्धिविनायक मंदिर, सिद्धिविनायक कॉलनी, सावेडी याठिकाणी “रक्तदान शिबिर” पार पडले. तसेच, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना “व्हिटैमीन सी” च्या गोळ्यांचे वाटप व महिलांची हिमोग्लोबीन (एच. बी.) तपासणी करण्यात आली. यासाठी जनकल्याण रक्तपेढी यांचे सहकार्य मिळाले.
हा कार्यक्रम माननीय महापौर श्री.बाबासाहेब वाकळे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री.भैय्या गंधे, उपमहापौर सौ.मालनताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक ६ भाजपा नगरसेविका श्रीमती.पल्लवी दत्तात्रय जाधव यांनी जनकल्याण रक्तपेढी, नगर यांच्या सहकार्याने आयोजित केला होता. यावेळी रक्तदात्यांना रा.स्व.संघ, मा.प्रांत संघचालक श्री.नानासाहेब जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमास मनपा अहमदनगर महापौर माननीय श्री.बाबासाहेब वाकळे, नगरसेवक श्री.रवींद्र बारस्कर, नगरसेविका सौ.वंदनाताई ताठे, नगरसेविका श्रीमती.पल्लवी जाधव, तसेच ज्येष्ठ नागरिक श्री.ज्ञानदेव शहाणे, जनकल्याण समिती कार्यवाह डॉ.मनोहर देशपांडे, डॉ.अनिल जगदाळे, भा.ज.पा. शक्ती केंद्रप्रमुख सावेडी श्री.पुष्कर कुलकर्णी, श्री.कुलदीप कुलकर्णी, श्री.निलेश जाधव, श्री.दिपक धाडिवाल, सौ.स्वाती पवळे, श्री.महेश शहाणे, श्री.स्वानंद मुळे, ऍड.कौस्तुभ कुलकर्णी व जनकल्याण समिती कर्मचारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच प्रभाग क्रमांक ६ परिसरातील नागरिक, महिला वर्ग उपस्थित होते. सर्व कार्यक्रम हे प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार पार पडले.
आणखी बातम्या
अहमदनगर जिल्ह्यात आज ९२२ बाधितांची रुग्णसंख्येत भर, ८३.७८ % बरे होण्याचे प्रमाण.
जनता कर्फ्यू बाबत निर्णयाचा चेंडू स्थानिक नेत्यांच्या कोर्टात.
नगर शहर वार्ड क्रमांक ६ येथे विविध उपक्रम संपन्न.
जनऔषधि केंद्रांची संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य.