भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसा निमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आज अहमदनगर शहर वार्ड क्रमांक ६ येथे विविध कार्यक्रम माननीय महापौर श्री बाबासाहेब वाकळे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री भय्या गंधे, उपमहापौर सौ मालन ताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले. आज नगरसेविका श्रीमती पल्लवी दत्तात्रय जाधव यांच्या तर्फे वृक्षारोपण, नागरिकांना आर्सेनिक अल्बम व मास्क वाटप आणि स्वच्छता अभियान हे उपक्रम आयोजित करण्यात आले.
          कार्यक्रमाची सुरुवात महापौर श्री बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन झाली. त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक ६ परिसरातील महिला वर्ग व इतर नागरिकांनी वृक्षारोपण केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना आर्सेनिक अल्बम व मास्क यांचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील स्वच्छता देखिल करण्यात आली.
          यावेळी अहमदनगर मनपा महापौर माननीय श्री बाबासाहेब वाकळे, नगरसेवक श्री रवींद्र बारस्कर, नगरसेविका सौ वंदना ताई ताठे, नगरसेविका श्रीमती पल्लवी जाधव, नगरसेवक श्री मनोज दुल्लम, तसेच ज्येष्ठ नागरिक श्री ज्ञानदेव शहाणे, जनकल्याण समिती कार्यवाह डॉ.मनोहर देशपांडे, डॉ.अनिल जगदाळे, भा.ज.पा. युवा कार्यकर्ते श्री मनोज ताठे, शक्ती केंद्रप्रमुख सावेडी श्री पुष्कर कुलकर्णी, श्री कुलदीप कुलकर्णी, श्री निलेश जाधव, श्री शिवा आढाव, सौ स्वाती पवळे, तसेच प्रभाग क्रमांक ६ परिसरातील नागरिक, महिलावर्ग आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते. सर्व कार्यक्रम हे प्रशानाने आखून दिलेल्या नियमानुसार पार पडले.
          उद्या गुरुवार, दि. १७/०९/२०२० रोजी सकाळी ठीक १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सिद्धिविनायक मंदिर, सिद्धिविनायक कॉलनी, सावेडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जनकल्याण रक्तपेढी यांचे सहकार्य मिळाले असून या कार्यक्रमास प्रशानाने आखून दिलेल्या नियमानुसार स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे असे आव्हान अहमदनगर मनपा भाजपा प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका श्रीमती पल्लवी दत्तात्रय जाधव यांनी केले आहे.

आणखी बातम्या

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दरेवाडी ता नगर येथे रक्तदान शिबिर सपंन्न.

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, सेवा सप्ताहाचे आयोजन.

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, काँगेसच्या वतीने निवेदन.