केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय.

           केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात येणार असून त्याआधारे योग्य त्या सुधारणांचा मसूदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करण्यात येईल व त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य […]

नगरशहर शिवसेनेत धुसफूस , पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र.

           अहमदनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकसाठी निवड १ ऑक्टोबर रोजी होणार असुन यावरुन शहर शिवसेनेत शिवसेनेत सारे काही अलबेल नाही. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी ‘स्वीकृत’साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे.           शेळके यांनी पाठविलेल्या पत्रात लिहले आहे की, अहमदनगर […]

निष्ठावंत शिवसैनिक मा. मंत्री अनिलभैय्या राठोड यांना श्रद्धांजली.

           ५ ऑगस्ट २०२० रोजी माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांचे निधन झाले. आज राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. नगरच्या नक्षत्र लॉनमध्ये झालेल्या या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनीच अनिलभैय्या राठोड यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांच्या बरोबरच्या विविध आठवणीला उजाळा दिला. या श्रद्धांजली […]

राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण.

          १४ व २७ ऑगस्टला ट्वीट करत कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी कोरोना लस वितरणाबाबत काही सूचना केंद्र सरकारला केल्या होत्या.केंद्र सरकारने सदर सूचना किती गांभीर्याने घेतल्या हा वेगळा मुद्दा आहे. A fair and inclusive Covid vaccine access strategy should have been in place by now. But there are still no signs of it. […]

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान.

          भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. यात महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. मा.विनोद तावडे, मा.पंकजा मुंडे, मा.सुनील देवधर, मा.विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, मा.हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदाची जबादारी आता कर्नाटकचे युवा खा.तेजस्वी सूर्या यांच्या कडे देण्यात आली […]

अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा ?

(अहमदनगर -अनिरुध्द तिडके)           अहमदनगर महापालिकेत शिवसेनेने दिलेला शब्द पाळल्याने भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या श्री. मनोज कोतकर यांची स्थायी सभापतिपदी निवड झाली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार मा. संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून आभार मानले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीशी असलेले मतभेद मिटविण्याचे काम आता शिवसेनेत नव्याने दाखल झालेले जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख करीत […]

भाकप, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शेतकरी व कामगार विधेयकांच्या निषेधार्थ निदर्शने.

           केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी आज भारत बंदला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केले. तसेच नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास […]

अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनचे मनोमिलन, अखेर राष्ट्रवादीचे कोतकर ‘स्थायी’चे सभापती.

           अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अखेर राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची निवड झाली. वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार अखेर शिवसेनेनेचे उमेदवार मा. योगीराज गाडे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.          आज जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल […]

प्रदेश भाजपात कोणतेही मतभेद नाहीत, भाजपा हा एकसंघ आहे- मा. विनोद तावडे

           पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.            यावेळी त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा फेटाळून लावली.’प्रदेश भाजपात कोणतेही मतभेद नाहीत,‘भाजपा हा एक संघ आहे. भाजपा मध्ये कुठलीही फळी नाही. राज्यात तसं कुठलंही वातावरण नाही, असं मत […]

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण.

          आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असून त्या निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर भारतीय जनता पार्टी, नगर शहरच्या वतीने सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक येथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.           या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री मा. श्री. विनोद तावडे., प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री तथा […]