अहमदनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकसाठी निवड १ ऑक्टोबर रोजी होणार असुन यावरुन शहर शिवसेनेत शिवसेनेत सारे काही अलबेल नाही. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी ‘स्वीकृत’साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
           शेळके यांनी पाठविलेल्या पत्रात लिहले आहे की, अहमदनगर मध्ये गुरुवार दि. 1 ऑक्टोबर रोजी स्वीकृत नगरसेवक भरणार आहेत. आजपर्यंत स्व.अनिलभैय्या राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही. म्हणूनच शहरामध्ये शिवसेना संघटना बळकट राहिली. परंतु काही दिवसांपासून जातीचे राजकारण पक्षात सुरु झाले आहे. यातूनच स्व.अनिल भैय्या राठोड यांना पराभूत केले गेले. आजही स्वीकृत नगरसेवक निवडीवेळी जातीचे राजकारण करुन दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले जात आहेत.
          आपण यात लक्ष घालावे नाहीतरी अहमदनगर शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी व काही जातीयवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचे काम सुरु केले आहे. तरी आपण यात तातडीने लक्ष घालावे व नगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसफूस थांबवावी. अन्यथा पुढील काळात आपल्या शिवसेनेला मोठी किंमत मोजवी लागणार आहे, असे शेळके यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत मा. मंत्री शंकरराव गडाख आणि शिवसेना शहर प्रमुख दिलीपदादा सातपुते यांनाही देण्यात आली आहे.

आणखी बातम्या

MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे.

कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम

शेवगाव तालुक्यातील रांजनी गावातील ग्रामस्थांनी केली ग्रामसभेची मागणी.

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज.