दौंड तालुक्यातील पाटसचे कोविड सेंटर ठरत आहे रुग्णांचे आधार केंद्र.
दौंड तालुक्यातील पाटस येथील नागेश्वर विद्यालयात पाटसकरांच्या पुढाकाराने शासनमान्य कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. यात पन्नास बेड सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात सकाळी योग अभ्यास झाल्यानंतर प्रशासनाकडून सर्व रुग्णांना पौष्टिक व योग्य आहार वेळचे वेळी दिला जातो. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांची पाटसकरांनी विशेष काळजी घेत आहेत. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर […]
मा. आ. अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन.
शिवसेनेचे उपनेते मा.आ.धर्मवीर अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. नगर मधील बुरूडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे ही सभा होणार आहे. रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत ही सभा होईल. राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख […]
विविध प्रश्नी मा. आ. रोहित पवार यांनी घेतल्या मंत्र्यांच्या भेटी.
कोरोना महामारीमुळे देश व देशाअंतर्गत व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणींला सामोरे जावे लागत आहे. त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना काही नियमांच्या आधीन राहून परवानगी देण्यात आली. परंतु त्यास पुरक असणारा साऊंड, लाईट, जनरेटर, मंडप ह्या व्यावसायिकांचा व्यवसाय अजून ठप्प आहे. यामुळे या सेवा देणारे लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आहेत. आज मा. आ. […]
अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ९२३ बाधितांची भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २३ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी ६.०० वाजले पासून आज सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२३ ने वाढ झाली. […]
मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.
मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे मा.विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने दि.२१.०९.२०२० रोजी विनंती अर्ज दाखल केला आहे. या कामी दिलेले स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील (एसईबीसी) विद्यार्थी […]
अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शना पुरवठा सुरळीत करावा- आ. संग्राम जगताप
अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शना पुरवठा सुरळीत करावा यासाठी आ.संग्राम जगताप यांनी आज मा.ना.श्री.राजेशजी टोपे, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र सरकार. यांना भेटून पत्र दिले तसेच याबाबत चर्चा केली. आ.संग्राम जगताप यांनी पत्रामध्ये लिहले आहे “अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास […]
रयत विद्यार्थी परिषद यांचे पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत विविध मंजूर कामावर प्रश्नचिन्ह.
रयत विद्यार्थी परिषद यांनी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन, पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत विविध मंजूर कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे. सध्याच्या कोविड संकटामुळे महाराष्ट्र शासन यांनी आर्थिक पातळीवर काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्या अनुषंगाने उपलब्ध निधीमध्ये, केंद्र पुरस्कृत योजना व राज्य […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ९०० बाधितांची रुग्णसंख्येत भर तर ९३३ रुग्णांना डिस्चार्ज.
अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू […]
अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ४४८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २१ सप्टेंबर २०२०, रात्री ७.०० वाजेपर्यंत ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४०५ ने […]
रस्ते तातडीने दुरूस्त करा, अन्यथा काळे फासण्यात येईल ! महापौर वाकळे यांचा इशारा.
नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या दुरावस्थेप्रकरणी महापौर मा. बाबासाहेब वाकळे यांनी अधीक्षक अभियंता (सा.बा.वि. नगर) यांना पत्र पाठवले आहे. पत्रामध्ये त्यांनी रस्ते तातडीने दुरूस्त करा अन्यथा काळे फासण्यात येईल, असा इशारा दिला आहे. पत्रामध्ये महापौर यांनी लिहले आहे कि ‘कळविण्यांत येते की, अहमदनगर शहरातून जाणा-या मनमाड ,पुणे, औरंगाबाद, सोलापूर , कल्याण या महामार्गावरून मोठया […]