दौंड तालुक्यातील पाटस येथील नागेश्वर विद्यालयात पाटसकरांच्या पुढाकाराने शासनमान्य कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. यात पन्नास बेड सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात सकाळी योग अभ्यास झाल्यानंतर प्रशासनाकडून सर्व रुग्णांना पौष्टिक व योग्य आहार वेळचे वेळी दिला जातो. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांची पाटसकरांनी विशेष काळजी घेत आहेत.
           कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण पाटस कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्यात पहिल्याच दिवशी खूप दडपण व भीती निर्माण झाली होती. पण डॉ.बडे यांनी पहिल्याच भेटीत सर्वांना सांगितले, हे कोविड सेंटर नसून हे तुमचे घरच आहे. तसेच रात्री बेरात्री अडचण आल्यावर कधीही फोन करा असा विश्वास डॉ.बडे यांनी सर्व रुग्णांना दिला.
           दरम्यान, सेंटर मधील सर्व रुग्णांना सकाळची सुरुवात योगा करून झाली, सकाळी आठ वाजता चहा, पोहे यांचे वाटप झाले की हळद दूध वाटप करून उकडलेली दोन-दोन अंडी दिली जातात, तसेच काही वेळातच पुन्हा सर्वांनाच सफरचंद आणि मोसंबी देऊन दिवसाची सुरवात केली जाते. दुपारी सर्व रुग्णांना पौष्टिक पोटभर जेवण दिले जाते. पुन्हा चारच्या सुमारास चहा व हळद दूधाचा काढा पिण्यासाठी दिला जातो आणि रात्री आठच्या सुमारास जेवण दिले जाते.
          पाटस येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये पाटसकर अहोरात्र नियमितपणे रुग्णांची काळजी घेत आहेत. कोरोना रुग्णांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, पाटस येथील सत्वाशील शितोळे व उद्योजक नितीन शितोळे यांच्या माध्यमातून अनेक नागरिक कोविड केअर सेंटरला भरभरून मदत करत आहेत, पाटस परिसरात रोज जनजागृती करून नव्याने संशयितांची तपासणी केली जात आहे.
          अँटीजेन टेस्ट आयोजित करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आधार देऊन येथे रुग्णांना दाखल करून घेत आहेत. येथे आतापर्यंत 3 वर्षांपासून ते 85 वर्षांपर्यंतचे रुग्ण ठणठणीत बरे होऊनच बाहेर पडले आहेत. दौंड तालुक्यातील पाटस येथील शासकीय कोविड केअर सेंटर हे एक उपचार केंद्रच नव्हे तर रुग्णांना साठी आधार केंद्र ठरत आहे.
          पाटसकरांनी लोकवर्गणीतून रुग्णांच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होण्यासाठी दररोज विशेष काळजी घेतली. यामुळे कोरोना मुक्त रुग्णांनी पाटसकारांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. तसेच या जागतिक महामारीतून सावरण्यासाठी पैसा, पद, अधिकार काहीच उपयोगाचा नसून फक्त आपले पणाची भावना कोरोनाच्या संकटावर रामबाण उपाय ठरत आहे. अशी खात्री अनेकांनी व्यक्त केली आहे.

आणखी बातम्या

रयत विद्यार्थी परिषद यांचे पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत विविध मंजूर कामावर प्रश्नचिन्ह.

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ७७८ बाधितांची भर.

विविध प्रश्नी मा. आ. रोहित पवार यांनी घेतल्या मंत्र्यांच्या भेटी.’