शिवसेनेचे उपनेते मा.आ.धर्मवीर अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. नगर मधील बुरूडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे ही सभा होणार आहे.
          रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत ही सभा होईल. राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब हे लाईव्ह सभेला संबोधित करणार आहेत. कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग चे तसेच शासनाचे सर्व नियम पाळून ही सभा होणार आहे. राज्यातील नेते मंडळी, मंत्री महोदय तसेच सर्व पक्षीय नेते मंडळी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
          या सभेत धर्मवीर अनिल भैय्या यांच्या जीवनावर आधारित एक ध्वनिचित्रफीत दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ही सभा सोशल मीडिया प्रमोशन हॅन्डल द्वारे- फेसबुक, यु ट्यूब वर लाईव्ह दाखविण्यात येणार आहे. तरी या सभेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे व उत्तर जिल्हा प्रमुख श्री. रावसाहेब खेवरे यांनी केले आहे.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ७७८ बाधितांची भर.

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.

दौंड तालुक्यातील पाटसचे कोविड सेंटर ठरत आहे रुग्णांचे आधार केंद्र.

विविध प्रश्नी मा. आ. रोहित पवार यांनी घेतल्या मंत्र्यांच्या भेटी.’