अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शना पुरवठा सुरळीत करावा यासाठी आ.संग्राम जगताप यांनी आज मा.ना.श्री.राजेशजी टोपे, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र सरकार. यांना भेटून पत्र दिले तसेच याबाबत चर्चा केली.
           आ.संग्राम जगताप यांनी पत्रामध्ये लिहले आहे “अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे, अशा रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयातील रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा संपला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जाहीर केले आहे. तसेच खाजगी रुग्णालयामध्ये देखील रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे, अशा रुग्णांचा जीव या इंजेक्शन आभावी धोक्यात आला आहे. त्यामुळे सदर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच रेमडेसीवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबीयांची धावपळ होत आहे. त्यामुळे नागरीक रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणेबाबत माझ्याकडे मागणी करत आहे. तसेच माहिती घेतली असता, महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. मात्र अहमदनगर जिल्ह्याला त्या तुलनेत रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
           तरी आपणास विनंती करण्यात येते की, अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावा.”

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आज ९०० बाधितांची रुग्णसंख्येत भर तर ९३३ रुग्णांना डिस्चार्ज.

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.

रस्‍ते तातडीने दुरूस्‍त करा, अन्यथा काळे फासण्‍यात येईल ! महापौर वाकळे यांचा इशारा.

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे मागणी, ‘कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा.’