अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक,14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला अंमलीपदार्थ प्रकरणात आज अटक करण्यात आली असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरु होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. तिला कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रिया चक्रवर्ती अभिनेता सुशांत राजपूत याची गर्लफ्रेंड […]
ट्रक आडवुन खुनासहित दरोडा टाकणारे सराईत आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद
शिर्डी जवळील टोल नाक्यावर ट्रक आडवुन खुनासहित दरोडा टाकणारे सराईत आरोपी २४ तासाचे आत पोलिसांनी जेरबंद केले. लोणी पोलीस स्टेशन व नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. दिनांक ०७/०९/२०२० रोजी फिर्यादी भुपेंद्रसिंह […]
अहमदनगर जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी पूर्ण
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगर जिल्हा परिषद मुख्यालयात कर्मचार्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. जि.प.सभागृहात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनिल गडाख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, साथरोग अधिकारी दादासाहेब साळुंके, जि.प.कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, […]
अहमदनगर जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज तर नव्या ६२५ बाधितांची रुग्ण संख्येत भर
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा. ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळात विशेषाधिकारभंगाचा प्रस्ताव.
मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार मा. प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना शिवसेनेचे आमदार मा. प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी जोरदार टीका केली तसेच शिवसेनेचे मा. अनिल परब […]
अहमदनगर जिल्ह्यात आज नव्या १६४ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण […]
जिल्हा मंडप व व्यवसायिक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर मधील सर्व प्रकारच्या सामाजिक कार्याक्रमांमध्ये मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्सच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना किंवा 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर डोकोरेटर्स व्यवसायिक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे, रघुनाथ चौरे, सुरेश रोकडे, विकास पटवेकर, अमित शेटे, जाफरभाई, शेख समिर, […]
राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह
राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांनी काल केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या संबधी राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट करून महिती दिली. राज्यमंत्री यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे “सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत […]
अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या २२ हजाराहून अधिक
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०७ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ […]
महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर.
महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षांच्या सुधारित तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर करण्यात आल्या असून नवीन वेळापत्रकानुसार परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे राहतील १) पूर्व परीक्षा २०२० – ११ ऑक्टोबर २) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० – २२ नोव्हेंबर ३) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० – १ नोव्हेंबर या सुधारित तारखांची महिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने […]