अहमदनगर मधील  सर्व प्रकारच्या सामाजिक कार्याक्रमांमध्ये मंडप, कार्यालय, हॉल, लॉन्सच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना किंवा 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अहमदनगर जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर डोकोरेटर्स व्यवसायिक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे, रघुनाथ चौरे, सुरेश रोकडे, विकास पटवेकर, अमित शेटे, जाफरभाई, शेख समिर, हुसेन शेख, सुनिल अरकल, पोपट राऊत, बबलू ससे आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हणाले, कोरोना महामारीमुळे देश व देशाअंतर्गत व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणींला सामोरे जावे लागत आहे. त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली. यामुळे टेन्ट, मंडप, कॅटरिंग, बँक्वेट हॉल, डी.जे.साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आहेत आणि त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या करण्यास प्रेरित होत आहे.

     भारत सरकारच्या आदेशान्वये 50 लोकांच्या उपस्थितीत हॉटेल, बँक्वेट, हॉल मंडप, फार्म हाऊस, टेन्ट यात लग्नसमारंभ करण्याची परवानगी आहे. एवढ्या कमी संख्येत कार्यक्रम करण्यासाठी आयोजक सहमत नाहीत. व्यवसायात एवढ्या कमी संख्येत कार्यक्रम केल तर त्याचा खर्च ही निघत नाही. त्यामुळे कार्यक्रम होत नसल्यामुळे संबंधित व्यवसायधारक व त्यांच्यावर अवलंबून असलेली लाखो परिवारांना आर्थिक चिंतेने ग्रासले आहेत.

     संबंधीत व्यवसाय धारकाच्या भावना एक मताने सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मंडप, कार्यालय, हॉल लॉनच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी 500 व्यक्तीच्या उपस्थितीत लग्न व इतर कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी तसेच केंद्र शासनाच्या सहायता पॅकेज अंतर्गत टेन्ट, मंडप, केटरिंग, बँक्वेट हॉल, डी.जे.लाईट डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक, सहभागी भागीदार इत्यादीच्या आर्थिक अडचणींचा विचार करुन त्यांच्या सहकार्यासाठी योग्य तो विचार करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.