अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा. ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०४६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२८खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२२ आणि अँटीजेन चाचणीत १७५ रुग्ण बाधीत आढळले.

 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२०, पाथर्डी ११, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा ०४, श्रीगोंदा ०२, पारनेर ०१, राहुरी ०२, शेवगाव ४८, कोपरगाव ०१, जामखेड ०५, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३३, संगमनेर ०१, राहाता १२,पाथर्डी ०३, नगर ग्रामीण २३, श्रीरामपुर ०७, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०१, श्रीगोंदा ०५,  पारनेर ०६, राहुरी १३, शेवगाव ०२, कोपरगांव ०६ जामखेड ०५ आणि कर्जत ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

अँटीजेन चाचणीत आज १७५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर १९, राहाता १४, नगर ग्रामीण ०२, श्रीरामपूर १५, नेवासा ३१, श्रीगोंदा १५, अकोले ०४, राहुरी ०२, शेवगाव २०, जामखेड २८ आणि कर्जत २५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

दरम्यान, आज ५२४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०१, संगमनेर २२, राहाता ४०, पाथर्डी २१, नगर ग्रा.३८, श्रीरामपूर ३६, कॅंटोन्मेंट १७,  नेवासा ०६, श्रीगोंदा ०५, पारनेर १५, अकोले १५, राहुरी २६, शेवगाव १७,  कोपरगाव २४, जामखेड १४, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

बरे झालेली रुग्ण संख्या: २२६७४

उपचार सुरू असलेले रूग्ण:४०४६

मृत्यू:३८९

एकूण रूग्ण संख्या:२७१०९