अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५८९ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८३, पाथर्डी ०८, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर ०२, नेवासा ०३, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, राहुरी ०२, शेवगाव ४५, कोपरगाव ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

हे वाचा:

पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात महाराष्ट्र विधानसभा

विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव.


दरम्यान, आज ५२४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०१, संगमनेर २२, राहाता ४०, पाथर्डी २१, नगर ग्रा.३८, श्रीरामपूर ३६, कॅंटोन्मेंट १७नेवासा ०६, श्रीगोंदा ०५, पारनेर १५, अकोले १५, राहुरी २६, शेवगाव १७कोपरगाव २४, जामखेड १४, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या: २२६७४

उपचार सुरू असलेले रूग्ण:३५८९

मृत्यू:३८३

एकूण रूग्ण संख्या:२६६४६

 

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)