अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला अंमलीपदार्थ प्रकरणात आज अटक करण्यात आली असून तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरु होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली. तिला कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    रिया चक्रवर्ती अभिनेता सुशांत राजपूत याची गर्लफ्रेंड असून सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तिची चौकशी सुरू आहे. तसेच ईडी ने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देखील तिची चौकशी केली आहेएनसीबीने आज तिला अंमलीपदार्थ प्रकरणात अटक केली. याआधी रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला देखील एनसीबीने अटक केली होती, त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली असुन त्यांची चौकशी सुरु आहे.

सुशांत सिंगची बहीण प्रियंका सिंहविरुद्ध तक्रार    

    काल सायंकाळी 7 वाजता रिया हिने वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुशांत सिंगची बहीण प्रियंका सिंहविरुद्ध तक्रार दाखल केली. हि तक्रार रियाने सुशांत सिंह यांना डॉक्टरांनी सांगितलेली औषधे प्रियांकानेन दिल्याबद्दल दाखल केली आहे. यात सुशांत सिंहची बहीण प्रियंका सिंह, डॉक्टर तरुण कुमार, मितू सिंह आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.