Hatti Barav : ‘हत्ती बारव’ राष्ट्रीय संरक्षित स्मारक व्हावे; सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जिल्हा प्रशासनाकडून कराची टोपली
विक्रम बनकर (नगर) : शहराजवळील दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या जामखेड रोडवरील ‘हत्ती बारव’ या ऐतिहासिक ठेव्याचा समावेश राष्ट्रीय संरक्षित स्मारकात सामावेश व्हावा यासाठी शहरातील सामाजिक संस्था सातत्याने पाठपुरावा करत आहेत परंतु याला जिल्हाधिकारी कार्यालय सहकार्य करताना दिसत नाही. केंद्रीय पुरातत्व विभागाने “हत्ती बारव’, राष्ट्रीय संरक्षित स्मारक होण्यासाठीचा केंद्रीय पुरातत्व विभागाचा प्रस्ताव अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी […]
Crime : महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद; ५.५० लाखाच्या ६ दुचाकी केल्या हस्तगत
विक्रम बनकर (नगर) : महागड्या दुचाकी चोरून त्या शेतात,जंगलात किंवा डोंगर भागात लपवायच्या व काही कालांतराने त्या वाहनांचा सोक्षमोक्ष लावायचा ही त्यांची चोरीची सूक्ष्म पद्धत पोलिसांनाही चकवा देणारी होती, मात्र कोतवाली पोलिसांनी टोळीला जेरबंद तर केलेच त्यानंतर त्यांनी चोरलेल्या महागड्या दुचाक्याही हस्तगत केल्या आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी दि.७ डिसेंबर रोजी नगरच्या वैभव घोरपडे यांची पल्सर […]
ST : ग्रामीण व सर्वसामान्य लोकांसाठी एसटी ही एक प्रकारची जीवनवाहिनी; एसटीच्या अहमदनगर आगाराकडून सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन
विक्रम बनकर(नगर): अपघातांवर नियंत्रण राहून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे. प्रवाशांसाठी तत्पर असणाऱ्या सेवेकरांनो अपघातांवर नियंत्रण ठेवून त्यांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यास प्राधान्य द्यावे. रस्ता व सुरक्षा नियमांचे पालन करून अपघातमुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभागाकडून […]
Job : ११ जानेवारीला जागेवर मिळणार नोकरी; ‘या’ शहरातील सहाय्यक आयुक्तांनी पत्रक काढत केले प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
विक्रम बनकर (नगर ) :- जिल्हयातील उमेदवारांना खाजगी आस्थापनेमध्ये विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह (जागेवर नोकरीची संधी) चे ११ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ११-०० ते दुपारी २-०० या वेळेत प्रशासकीय इमारत ,पहिला मजला, टि.व्ही. सेंटरजवळ, अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले असुन इच्छूक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून […]
जिल्हा वार्षिक योजनेच्या 630 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
विक्रम बनकर (नगर ) : जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकच्य वार्षिक योजनेतंर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शास30 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित केलेली आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रारुप आराखड्यास राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व […]
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा नामदार विखे पाटील यांच्या लोणी कार्यालयावर मोर्चा
विक्रम बनकर (नगर ) : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) प्रणित जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी लोणी येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, शासकीय […]
नवीन वर्ष, नाताळ निमित्त साईचरणी १५ कोटींची देणगी जमा; प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांची माहिती
विक्रम बनकर(नगर): श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ याकालावधीत सुमारे ०८ लाखाहुन अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर याकालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे […]
Congress : जिल्ह्यातील लोकसभेची किमान एक जागा काँग्रेस पक्षाने लढवावी: विनायक देशमुख
विक्रम बनकर (नगर) : १३८ वर्षाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या काँग्रेस पक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेची किमान एक जागा लढवावी,” असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. विनायकराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केले आहे. यासंदर्भात श्री. देशमुख यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.श्री. मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी, खा. श्री राहुल गांधी, राष्ट्रीय महासचिव […]
My Home India : आज लता मंगेशकर स्मृति पुरस्कारांचे वितरण; ‘माय होम इंडिया’ने गेल्या वर्षापासून पुरस्काराची सुरुवात
ब्युरो टीम : माय होम इंडिया द्वारे स्थापित करण्यात आलेले भारतीय संगीतसाधकांसाठीचे लता मंगेशकर स्मृति पुरस्कार येत्या शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि प्रख्यात गायक सुदेश भोसले यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. आठ दशकांची कारकिर्द लाभलेल्या आणि ज्यांचा आवाज आजही जगभरतील कोट्यवधी घरांतून गुंजत असतो अशा भारतरत्न लता मंगेशकर […]
Sunny Nimhan : सिलेंडर स्फोटाच्या घटना घडू नये यासाठी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत निरीक्षक पाठवून लक्ष ठेवण्याची माजी नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी
ब्युरो टीम : पुणे शहरात विमाननगर भागात अवैधरित्या बाळगण्यात आलेल्या १० घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने पुढील अनर्थ टळला, परंतु या घटनेमुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने माजी नगरसेवक सनी निम्हण क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत निरीक्षक पाठवून लक्ष ठेवण्याचे मागणी केली […]