विक्रम बनकर (नगर) : शहराजवळील दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या जामखेड रोडवरील ‘हत्ती बारव’ या ऐतिहासिक ठेव्याचा समावेश राष्ट्रीय संरक्षित स्मारकात सामावेश व्हावा यासाठी शहरातील सामाजिक संस्था सातत्याने पाठपुरावा करत आहेत परंतु याला जिल्हाधिकारी कार्यालय सहकार्य करताना दिसत नाही.

केंद्रीय पुरातत्व विभागाने “हत्ती बारव’, राष्ट्रीय संरक्षित स्मारक होण्यासाठीचा केंद्रीय पुरातत्व विभागाचा प्रस्ताव अहमदनगर जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी यांना 8 जून, 2022 रोजी दिला. त्या अनुषंगाने 28 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावासाठी मंजूर टिपणी प्रशासनाला दिली. माननीय संदीप जी निचित अप्पर जिल्हाधिकारी आणि राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी यांनी या प्रस्तावासाठी प्रयास केला. परंतु सद्याचे जिल्हा प्रशासन सर्व गरजेच्या कागदपत्रांची पूर्तता करून, सर्व आवश्यक “ना हरकती” घेऊन देखील पुढील कारवाईसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

केंद्रीय पुरातत्त्व विभागाला सदर ऐतिहासिक वास्तू स्वतःच्या अधिकारात घेण्याकरता वास्तूच्या मालमत्ता पत्रकामध्ये हत्ती बारव या वास्तूची नोंद करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाला विशेष करून जिल्हाधिकारी तहसीलदार यांना कळवले.

ऑगस्ट 2022 पासून ते आज तयागत यावर कुठलीही कारवाई झाली नाही. नवीन जिल्हाधिकारी श्री सालीमाठ आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी तसेच तहसीलदार संजय शिंदे यांच्या वारंवार लक्षात आणून देखील यावर योग्य ती कारवाई करण्यास तत्परता दाखवली गेली नाही.

या संदर्भात सप्टेंबर 2023 रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यामध्ये त्यांनी यथोचित निर्देश देऊनही सदर प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे.

“हत्ती बारव’, राष्ट्रीय संरक्षित स्मारक होण्यासाठी या सामाजिक संस्था कुठल्याही राजकीय नेत्याचा पाठिंबा घेतला नाही म्हणून तर या वास्तूचे पुढील वाटचाल लाल फितीत अडकली आहे. कदाचित यामुळेच जिल्हा प्रशासन, अहमदनगरच्या वैभवात भर घालणाऱ्या या गोष्टीकडे सोयीनं दुर्लक्ष करत आहे.असे सर्वसामान्यांना वाटू लागले आहे.

जिल्ह्याचे पालक, प्रतिनिधी म्हणून केंद्रीय पुरातत्त्व विभागासोबत समन्वय साधून या भव्य वास्तूस संरक्षण प्राप्त करून दिले तर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक स्तरावर या अमृत महोत्सवी वर्षाची अनुभूती सर्व जिल्ह्याचे नागरिक म्हणून घेऊ असे आम्हाला वाटते.

तांत्रिक बाबीची पूर्तता होण्यासाठी ज्या ना हरकती आवश्यक आहे त्यापैकी

1) ज्या दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत या ऐतिहासिक वास्तूचा समावेश होतो त्या ग्रामपंचयतीतर्फे ना हरकत दाखला आणि ठराव जोडला आहे.

2) वन विभागास ना हरकत मिळाली

3) या वास्तूला लागून अनेक लष्करी विभाग MIC &S यांची देखील ना हरकत मिळाली.

4) PWD विभागाची ना हरकत

5) हत्ती बारव हे नाव मालमत्ता पत्रकात नोंद करणे बाकी आहे