लग्नासाठी नकार, गोळी झाडून आत्महत्याचा प्रयत्न.
लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीचं डोकं भिंतीवर आपटल्यानंतर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली प्रवरा येथे घडली. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवळाली प्रवरा येथे एका तरुणाने प्रेयसीच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करून, पिस्तुलातून स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. विक्रम उर्फ विकी मुसमाडे (वय […]
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर आज तब्बल १३६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १४ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ९९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण […]
करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून ४८००० रुपयांचा ऐवज लुटला
करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून 48 हजारांचा ऐवज लुटला याबाबत मिळालेली माहिती नेवासा ते शेवगाव कडे बस जात असताना नेवासा फाटा येथे फिर्यादी ह्या बसमधून उतरली. तसेच बस मधून पंचवीस ते तीस वर्षे वयाचा एक इसम देखील उतरला व फिर्यादीस म्हणाला मी तुम्हाला करोनाचे ७००० रुपये मिळवून देतो. असे म्हणून फिर्यादी व […]
विदर्भातून विदेशात सहज होणार संत्र्याची निर्यात.
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल किफायती दरात बांग्लादेश येथे निर्यात करता यावा, यासाठी विशेष किसान रेल सुरु करण्यात यावी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत आज दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी बैठक घेतली विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांग्लादेश ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. […]
अहमदनगर जिल्ह्यात आठवड्यात रूग्ण संख्येत ४९९३ ने वाढ
अहमदनगर जिल्ह्यात दिनांक ६ सप्टेंबर २०२० ते १२ सप्टेंबर २०२० या आठवड्यात ४३०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर रूग्ण संख्येत ४९९३ ने वाढ झाली. या काळात ९८ रुग्ण मृत्यूमुखी पडले असुन १२ सप्टेंबर २०२० पर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता […]
अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १२ सप्टेंबर २०२०, रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
राज्यात ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी समित्यांची स्थापना.
कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत. आपत्कालिन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलेंडर आणि २०० जम्बो सिलेंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, […]
कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत
कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून एक चांगली बातमी आहे. या खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत आहे. ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होईल. मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे. असा अंदाज आहे की, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातील […]
निवडणूक आयोगाकडून “गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील प्रकाशित करण्यास” सुधारित मार्गदर्शक सूचना जारी.
निवडणूक आयोगाने दिनाक ११.०९.२०२० रोजी उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांविषयी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील प्रकाशित करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असुन, सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवार तसेच राजकीय पक्षांकडून नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जर काही तपशील असेल तर तर तो वृत्तपत्रांमध्ये आणि दूरचित्रवाणीवर प्रकाशित केला जाईल. प्रथम प्रसिद्धी ही फॉर्म […]
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७९ टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ११ सप्टेंबर २०२० रात्री ७-०० वाजेपर्यंत ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८५६ […]