निवडणूक आयोगाने दिनाक ११.०९.२०२० रोजी उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांविषयी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील प्रकाशित करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असुन, सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवार तसेच राजकीय पक्षांकडून नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जर काही तपशील असेल तर तर तो वृत्तपत्रांमध्ये आणि दूरचित्रवाणीवर प्रकाशित केला जाईल.
           प्रथम प्रसिद्धी ही फॉर्म मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेच्या चार दिवसांच्या आत. दुसऱ्या प्रसिद्धीची तारीख फॉर्म माघारीच्या शेवटच्या तारखेपासुन 5व्या ते 8व्या दिवसापर्यंत असेल. तिसऱ्या प्रसिद्धीची तारीख फॉर्म माघारीच्या 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत (मतदानाच्या तारखेच्या दोन दिवस आधी.) असेल. मतदान मंडळाने सांगितले की, ह्या मुळे मतदारांना अधिक माहिती मिळेल व त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडण्यास मदत होईल.
           बिनविरोध विजयी उमेदवार तसेच त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांच्या प्रसिद्धीसंदर्भात आयोगाने स्पष्ट केले की बिनविरोध विजयी उमेदवार ह्यांना देखील उमेदवारांविषयी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील प्रकाशित करावा लागेल. सुधारित सूचना तत्काळ प्रभावाने लागू होतील असे निवडणुक आयोगाने म्हंटले आहे.

आणखी बातम्या

कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत

उद्योग आधार ऐवजी आता उद्यम नोंदणी आवश्यक

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७९ टक्के

महाराष्ट्र जमीन महसूल 1971 मध्ये सुधारणाबाबत हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन